आरोग्यनामा ऑनलाइन टीम – खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे तसेच मसालेदार पदार्थ जास्त खाल्ल्याने पोटात जास्त प्रमाणात अॅसिड तयार होते, यामुळे पोटाचा अल्सर होतो. बॅक्टेरिया इन्फेक्शनमुळे सुद्धा हा आजार होतो. पोटात आतून पडलेले व्रण नंतर मोठे होऊन जखमा होतात. यामुळे त्रास वाढतो. पोटात अल्सर होण्याचे संकेत जाणून घेवूयात.
हे आहेत संकेत
१) छातीच्या आजूबाजूला तीव्र जळजळ होते.
२) उलटीमध्ये थोडेसे रक्त येणे.
३) अचानक वजन कमी होणे.
४) जेवणानंतर पोटात काही तरी टोचल्यासारखे वाटणे.
५) सतत पोटात वेदना होणे.
६) वारंवार भूक लागणे.
७) पोट फुगण्याची समस्या हा अल्सरचा संकेत असू शकतो.
८) दीर्घकाळापासून डार्क किंवा काळ्या रंगाच्या स्टूलची समस्या.