आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पचनसंस्थेच्या आवरणावर निर्माण होणारे व्रण, जखमा म्हणजे अल्सर होय. आमाशयचा अल्सर, पेप्टिक अल्सर किंवा गॅस्ट्रीक अल्सर असे अल्सरचे विविध प्रकार असतात. पोषणाची कमतरता, तणाव, अनियमित दिनचर्या यामुळे अल्सर होतो, असे मानले जात होते. परंतु, नवीन संशोधनानुसार अल्सर हा हेलिकोबॅक्टर पायरोली किंवा एच.पायरोली या विषाणूमुळे होतो. वेळीच उपचार न केल्यास याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. हा आजार कशामुळे होतो, त्यावरील उपाय याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
ही आहेत कारणे
बॅक्टेरिया
हवेतून हेलिकोबॅक्टर पायलोरी नामक बॅक्टरीया शरीरात जातात. हे बॅक्टरीया अल्सरची समस्या निर्माण करतात.
तणाव
नेहमी तणावात राहिल्याने अल्सरची शक्यता वाढते.
औषध
पेनकिलर्सचा हायडोसने सुद्धा अल्सरची समस्या होऊ शकते.
आहार
मिरची, मसालेदार पदार्थांचे सेवन केल्यास गरजेपेक्षा जास्त अॅसिड तयार होऊन अल्सर तयार होतो.
धुम्रपान
धुम्रपान केल्यामुळे शरीरात टार जमा होतो. हा पोटात जाऊन अल्सरची समस्या होते.
हे आहेत उपाय
* समान प्रमाणात पोहे आणि बडीशेप घेऊन चूर्ण तयार करून घ्या. २० ग्रॅम चूर्ण २ लिटर पाण्यामध्ये सकाळी टाकून ठेवा. त्यानंतर रात्रीतून हे पाणी घ्यावे. हे मिश्रण नियमितपणे सकाळी तयार करून दुपार किंवा संध्याकाळनंतर पिणे सुरु करावे. हे मिश्रण २४ तासात पूर्ण घ्यावे.
* दररोज २-३ केळीचे सेवन करावे. केळी आवडत नसेल तर मिल्कशेक करून घेऊ शकता.
* पत्ता कोबी आणि गाजर समान प्रमाणात घेऊन ज्यूस तयार करून घ्या. हे ज्यूस सकाळ-संध्याकाळ एक-एक कप घेतल्यास पेप्टिक अल्सरच्या रुग्णांना आराम मिळेल.
* अल्सरचा त्रास असलेल्या रुग्णांनी गायीच्या तुपाचे भरपूर सेवन करावे.