आरोग्यनामा ऑनलाइन टीम – या मधुमेहावर कायमचा उपाय शक्य नाही. परंतु योग्य औषधी घेऊन हे नियंत्रित केले जाऊ शकते. डायबिटीजचे टाइप १ डायबिटीज आणि दुसरा टाइप २ डायबिटीज असे दोन प्रकार आहेत. टाइप १ डायबिटीजमध्ये इन्सुलिन निर्माण बंद होते किंवा ते कमी प्रमाणात तयार होते. यामुळे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण जलद कमी होते आणि व्यक्तीला डायबिटीज होतो.
कोणत्याही वयात होतो
टाइप १ डायबिटीज बालपणी कोणत्याही वेळी होऊ शकतो. हा आजार ६ ते १८ पेक्षा कमी वय असलेल्या बालकांना होऊ शकतो. शिशु अवस्थेतही हा आजार आढळून येतो. इन्सुलिनच्या माध्यमातून टाइप १ डायबिटीज सहज नियंत्रित केला जाऊ शकतो. टाइप १ डायबिटीजचे लक्षण हे खुप लवकर दिसतात. सामान्यतः २ ते ३ आठवड्यात किंवा यापेक्षाही कमी वेळात टाइप १ डायबिटीजचे लक्षण दिसतात.
ही आहेत लक्षणे
१ वारंवार युरिन येणे.
२ सुस्ती येणे, उत्साह कमी होणे.
३ उलट्या होणे.
४ खूप जास्त भूक लागणे, तरीही वजन कमी होणे.
५ फिट्स येणे.
६ खूप जास्त घाम येणे
७ अंधूक दिसणे. हृदयाचे ठोके वाढणे. डोकेदुखी होणे.
८ खूप जास्त तहान लागणे.
नियंत्रण कसे मिळवावे
* जेवढी भूक आहेत तेवढेच खावे.
* इन्सुलिन घेताना नियमित शुगर तपासावी.
* नियमित एक्सरसाइज करावी.
* हेल्दी आहार असावा.
* जास्तीत जास्त मौसमी फळं, भाज्या सेवन कराव्यात.
ही काळजी घ्या
* मुलांना ते आजारी आहेत असा भास होऊ देऊ नये.
* मुलांच्या शारीरिक आरोग्यासोबतच त्यांच्या मानसिक आरोग्याकडेही लक्ष द्यावे.
* मुलांचा आहार हेल्दी असावा.
* मुलांनी नियमित एक्सरसाइज होईल याची काळजी घ्यावी. एक्सरसाइज करुन घ्यावी.
* नियमित शुगर तपासणी करावी आणि इन्सुलिन योग्य प्रमाणात द्यावे.