आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Type 2 Diabetes | चुकीची जीवनशैली, शारीरिक हालचालींचा अभाव, ताणतणाव आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी हे मधुमेह (Diabetes) वाढण्याचे कारण मानले जाते (Diabetes Control Tips). मधुमेह झाला की शरीरातील ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) वाढू लागते. हा रोग मुळापासून नष्ट करता येत नाही पण त्यावर नियंत्रण ठेवता येते (Type 2 Diabetes).
मधुमेहाचे 2 प्रकार आहेत – टाईप 1 मधुमेह आणि टाईप 2 मधुमेह (Type 1 Diabetes And Type 2 Diabetes). टाईप 1 मधुमेहामध्ये, स्वादुपिंडाद्वारे इन्सुलिन अजिबात तयार होत नाही, तर टाईप 2 मधुमेहामध्ये, इन्सुलिन (Insulin) कमी प्रमाणात तयार होते.
रक्तातील ग्लुकोज कमी करण्यात आहार महत्त्वाची भूमिका बजावते. पण असे काही पदार्थ आहेत जे मधुमेहाचा धोका कमी करू शकतात. गेजिरा विद्यापीठाने केलेले संशोधन एन्व्हायर्नमेंटल हेल्थ इनसाईट्समध्ये प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनानुसार, ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यासाठी एक प्रकारची भाजी खाणे हा सर्वोत्तम मार्ग आहे (Type 2 Diabetes).
रिसर्चमध्ये काय आढळले (What Found In Research)
संशोधकांना असे आढळून आले की, मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये कांदा आहारातील पूरक म्हणून वापरता येऊ शकतो. जो टाईप 1 आणि टाईप 2 मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करू शकतो.
संशोधकांनी सांगितले की, आहारात कांद्याचा समावेश केल्यास फायदा होऊ शकतो, परंतु याचा अर्थ असा नाही की कांदे जास्त प्रमाणात खाण्यास सुरुवात करावी. ही काही जादूची गोष्ट नाही. यावर अजून संशोधनाची गरज आहे.
मसल्स बनवणारे सप्लिमेंट्स देखील फायदेशीर
दुसर्या अभ्यासात असे दिसून आले आहे की मसल्स बनवणारे सप्लिमेंट्स देखील टाईप 2 मधुमेह असलेल्या लोकांना फायदेशीर ठरू शकते. संशोधनात,
न्यूकॅसल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांना असे आढळून आले की जेवणापूर्वी थोडेसे व्हे प्रोटीन (Whey protein) प्यायल्याने मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते.
न्यूकॅसल युनिव्हर्सिटीचे डॉ. डॅनियल वेस्ट (Dr. Daniel West) यांच्या म्हणण्यानुसार, हे संशोधन प्रयोगशाळेऐवजी सामान्य जीवन असलेल्या लोकांवर करण्यात आले.
आमचा विश्वास आहे की व्हे प्रोटीन दोन प्रकारे कार्य करते.
पहिले पचन तंत्रातून त्वरीत निघते आणि दुसरे म्हणजे व्हे प्रोटीन ब्लड शुगर वाढण्यापासून प्रतिबंधित करते.
डॉ. वेस्ट पुढे म्हणाले, जगभरात मधुमेहाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अशा परिस्थितीत, पूरक आहार तपासणे देखील खूप महत्वाचे आहे.
संशोधकांना असे आढळून आले की व्हे प्रोटीन घेणे खूप सोपे आहे. हे जेवणापूर्वी सहजपणे घेता येते.
व्हे प्रोटीन बहुतेकदा प्रोटीन शेकमध्ये वापरले जाते, जे अॅथलीट्स मसल्स रिकव्हरीसाठी वापरतात.
हे जगातील सर्वात जास्त विकले जाणारे सप्लिमेंट आहे. हे मधुमेहावर परिणामकारक ठरू शकते, परंतु संतुलित आहारासोबत घ्या.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Type 2 Diabetes | type 2 diabetes can control from cheapest vegetable onion whey protein also helps in control blood sugar