आरोग्यनामा ऑनलाईन टीम- हळद ही आपल्या रोजच्या वापरातील गोष्ट आहे. कोणत्याही भाजीला फोडणी दयायची असेल तर हळदीचा उपयोग केला जातो. त्यामुळे हळद ही बहुगुणी आहे असं म्हंटल जात. हळदीमध्ये करक्युम नावाचे घटक तत्व आढळून येते. ज्याचे औषधी गुण मानवाच्या आरोग्यासाठी फारच उपयोगी ठरते. आयुर्वेदामध्ये हळदीला अनन्यसाधारण महत्व आहे. हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात जंतुविरोधी, रोगप्रतिकारक क्षमता वाढविणारी, आणि कॅन्सर विरोधी घटक आढळून येतात. त्याचप्रमाणे हळदीमध्ये दाह विरोधी घटक तत्त्वे आढळून येतात. त्यामुळे जखमेवर गुणकारी ठरते.
१) खोकला : हळदीमध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढविणारी घटक तत्त्वे असतात. त्यामुळे हळदीचा दैनंदिन आहारात नियमित वापर केल्यास वारंवार होणाऱ्या सर्दी खोकल्यापासून बचाव होणे शक्य होते. त्यामुळे हळदीचा चहा किंवा काढा घेतल्यास सर्दी खोकल्यावर निश्चितच प्रतिबंध होतो.
२) त्वचेसाठी : त्वचेच्या समस्येसाठीही हळद खूपच फायदेशीर व बहुगुणी आहे. हळदीचा त्वचेकरिता नियमित वापर केल्यास त्वचेचे सामान्य आजार दूर होण्यास मदत होते.
३) कॅन्सर : हळदीमध्ये सर्वाधिक महत्वाचे घटक तत्व आढळून येतात. जे पूर्ण जगामध्ये कॅन्सरविरोधी प्रसिद्ध आहे. त्यामुळे हळदीचा नियमित वापर केल्यास कॅन्सर सारख्या आजारावर नक्कीच प्रतिबंध ठेवता येऊ शकतो.
४) पोटासाठी : पोटाच्या समस्येसाठीही हळद बहुगुणी ठरते. त्यामुळे हळदीचा दैनंदिन आहारात वापर केल्यास चयापचय क्रिया सुधारल्यामुळे शरीरातील चरबी कमी होवून वजन आटोक्यात येण्यासाठी मदत होते.