आरोग्यनामा ऑनलाईन टीम – भारतीय संस्कृतीत तुळशीला फार मोठे महत्व आहे. सहज उपलब्ध असणाऱ्या या वनस्पतीचे अनेक उपयोग आहेत. पूजाविधीमध्ये वापरली जाणारी तुळशी आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे. अनेक गंभीर आजारांवर उपचार करण्याकरिता तुळशीचे पान उपयुक्त ठरते.
जाणून घ्या तुळशीचे बहुगुणी उपयोग –
सर्दी-खोकला-
तुळशीचा चहा हा सर्दी-खोकला यावर प्राथमिक उपाय आहे. तुळशीची ताजी पाने धुवून घेऊन ती बारीक करावीत आणि एक कप पाण्यात घालावीत. त्यात सुंठ, इलायची पावडर हे पदार्थ घालावेत. हे मिश्रण उकळून घ्यावे. शरीराला ऊर्जा पुरवण्याचे काम तुळशीचा चहा करतो. तसेच २ चमचे तुळसीचा रस, एक चमचा मध दिवसातून ३ ते ४ वेळा घ्यावा. अशा तापाबरोबर असणारे सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी इत्यादी लक्षणेही तुळशीमुळे कमी होतात.
यकृताच्या समस्येवर गुणकारी-
तुळशीची १०-१२ पाने गरम पाण्याने धुवून रोज सकाळी खावीत. यामुळे यकृताच्या समस्येवर उपयोगी आहे.
तुळशीचा रस ओटीपोटात होणाऱ्या वेदनांवर गुणकारी –
ओटीपोटात वेदना होत असतील तर एक चमचा तुळशीच्या रस नाभि आणि पोटाच्या आसपास लावा.
जुनाट खोकला , पित्त , वात –
रोज सकाळी उठल्यावर तुळशीची दहा-पंधरा पाने १५० ग्रॅम पाण्यामध्ये उकळून प्यावीत. हे मिश्रण घेतल्यास जुनाट खोकला तसेच पित्त, वात यांसारखे रोग जातात.
त्वचेचे विकार-
गजकर्ण , खाज-खरूज इ. बुरशीजन्य त्वचेच्या विकारांवर तुळशीच्या पानांचा रस व लिंबाचा रस त्वचेवर लावावा.
जखम –
तुळशीची पाने वाटून जखमेवर लेप लावल्यास जखम स्वच्छ होऊन भरून येते.
रक्ताभिसरण सुरळीत चालते-
तुळशीच्या पानामुळे हृदयाचे रक्ताभिसरण सुरळीत चालते. त्यामुळे प्रत्येकाने दररोज १० ते १२ तुळशीची पाने चावून खावीत. किंवा तुळशीच्या पानांचा रस २ चमचे, एक चमचा मध दिवसातून २ ते ३ वेळा घ्यावा.