आरोग्यनामा ऑनलाइन – थंडीच्या मोसमात ताप, खोकला, सर्दी ईत्यादी समस्या वाढतात. अशावेळी एक वनस्पती रामबाण ठरू शकते. याबाबत आयुर्वेदातही माहिती देण्यात आली आहे. या वनस्पतीचे नाव आहे तुळस. तुळस जवळपास प्रत्येक घरात आढळून येते. विशेषकरून हिंदू संस्कृतीचे पालन करणार्यांच्या घरात तुळशीचे रोप आढळतेच. कारण, हिंदू धर्मात तुळस पवित्र मानली जाते. तुळशीत अनेक औषधीगुणधर्म आहेत. यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे होतात. हे फायदे कोणते ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
1 खुप ताप असल्यास तुळशीची पाने अर्धालिटर पाण्यात उकळून त्यामध्ये वेलची पावडर, दूध आणि साखर टाकून तयार केलेला काढा घेतल्यास शरीराचे तापमान कमी होते. तुळशीची कोवळी पाने पाण्यात उकळून प्यायल्याने मलेरिया आणि डेंग्यूच्या तापात फायदा होतो. तुळशीमध्ये अँटी बॅक्टेरिअल गुण असल्याने सर्व व्हायरल इन्फेक्शनपासून रक्षण होते.
2 तुळस, नाक, श्वासन नलिका आणि फुफ्फुसांमधील कफ काढण्यासाठी लाभदायक आहे. ज्यामुळे अस्थमाचा अटॅक व सर्दी, ताप तसेच फुफ्फुसांच्या आजारांपासून रक्षण होते. इन्फ्लूएंजा, घशातील खवखव झाल्यास लवंग, मीठ आणि तुळशीची पाने पाण्यात उकळवून प्यायल्यास आराम मिळतो.
3 तुळशीमुळे दिवसभराचा थकवा ताबडतोब दूर होतो. जर तुम्ही तणावात असाल तर रोज रात्री दूधात तुळशीची काही पाने टाकून उकळवून हे दूध प्यावे.
4 तुळशीत मोठ्या प्रमाणात अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी इंफ्लिमेंट्री गुण असतात, ज्यामुहे इम्यून सिस्टम मजबूत होते. रोज याचे सेवन केल्यास फ्ल्यूचा धोका दूर होतो.
5 महिलांना पीरियड्समध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे त्या त्रस्त असतात. अशावेळी तुळशीच्या बिया खुप लाभदायक ठरतात. पीरियड्समधील अनियमितता दूर करण्यासाठी तुळशीच्या पानांचे नियमित सेवन करावे.
6 तुळशीचा काढा सर्दी आणि तापात खुप उपयोगी ठरतो. हा काढा बनविण्यासाठी तुळशीची पाने पाण्यात टाकून त्यामध्ये काळीमिरी आणि मिश्री मिसळून चांगले उकळावे. हा काढा थंडीत खुप उपयोगी आहे.