आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बाजारात मिळत असलेल्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये केमिकल्स असल्याने अनेक साईडइफेक्टस होतात. यासाठी त्वचेवर नेहमी घरगुती उपाय करावेत. यामुळे त्वचा निरोगी आणि तजेलदार होऊ शकते. सौंदर्य जपण्यासाठी हे सोपे उपाय सहज करता येतात. त्वचा तजेलदार करण्यासाठी कोणते उपाय आहेत ते जाणून घेवूयात.
हे उपाय करा
१. सकाळी अनोशापोटी लिंबाचा चहा घ्या. पचनक्रिया मजबूत होते. त्वचेचे आरोग्य चांगले राहते.
२. रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर नारळाच्या तेलाने मसाज करा.
३. भाज्यांचा आहारात समावेश करा. गाजर, काकडी, मूळा आणि कोबी खा.
४. ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि फायबर असलेले पदार्थ खा.