आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसच्या दुसर्या लाटेमुळे संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याकाळात निरोगी राहणे खुप आवश्यक आहे. अशा स्थितीत हवामानातील बदलामुळे झालेला सर्दी-खोकला आणि फ्लूसुद्धा टेन्शन वाढवतो. या कारणामुळे झालेल्या सर्दी-खोकल्याची चिंता करू नका. घरातच राहून काही टिप्स फॉलो करून सहज आराम मिळू शकतो. जाणून घेवूया हे उपाय.
Coronavirus : घरात कोरोना रुग्ण असल्यास कोणती काळजी घ्यावी?, जाणून घ्या
1. मीठ-पाण्याची वाफ घ्या
जर सर्दी झाली तर मीठ पाण्याची वाफ घ्या. एका भांड्यात पाणी गरम करून घ्या, त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून त्याची वाफ घ्या. यावेळी डोकं झाकून घ्या.
2. हळदीचे दूध प्या
एक ग्लास गरम दुधात अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा साजूक तूप आणि अर्धा चमचा मध मिसळून रोज प्या. दोन-तीन दिवसात सर्दी-खोकला दूर होईल.
Coronavirus : शरीरातील ऑक्सिजन लेव्हल कमी होतेय? जाणून घ्या कधी येते हॉस्पीटलमध्ये जाण्याची वेळ
3. व्हिटॅमिन-सी चे सेवन करा
कोरोनापासून बचाव करण्यासाठी डॉक्टर्स व्हिटॅमिन-सी युक्त फळे आणि भाज्या खाण्याचा सल्ला देतात. यामुळे इम्यून सिस्टम मजबूत होते.
मलेरिया तापामुळे यकृताचे नुकसान होऊ शकते; जाणून घ्या लक्षणे आणि प्रतिबंध
4. काढ्याचे सेवन करा
तुळशीची पाने, आले, काळीमिरी, मध, सुंठ याचा काढा सेवन केल्याने अनेक आजार दूर राहतात.
पुस्तक वाचल्याने केवळ आपले ज्ञान वाढणार नाही तर आरोग्यासही होतील आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या
5. पाणी जास्त प्या
डॉक्टर्स सुद्धा सर्दीमध्ये जास्त पाणी पिण्याचा सल्ला देतात. यामुळे शरीर हायड्रेट राहते. टॉक्सिन बाहेर पडतात. नारळपाण्याचे सेवन सुद्धा करू शकता.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी दररोज ‘हे’ आसन करा !
शॉम्पू केल्याच्या दुसर्याच दिवशी केस तेलकट होतात? ‘हे’ घरगुती उपाय येतील तुमच्या कामाला, जाणून घ्या