आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पूर्वी लाकूड आणि मातीची खेळणी असत, तसेच धातूपासून तयार केलेली खेळणीही मुलांना खेळण्यासाठी दिली जात असत. काळाच्या ओघात नवनवीन शोध लागले आणि प्लॅस्टिक, पीव्हीसी इत्यादीपासून खेळणी तयार केली जाऊ लागली. सध्या तर अशाच प्रकारची खेळणी सर्वत्र उपलब्ध आहेत. ही खेळणी ज्या प्लास्टिक आणि पीव्हीसीपासून बनविण्यात येतात, त्यामध्ये काही विषारी तत्व असतात. अशी खेळणी मुलांनी तोंडात घातली, चावली तर त्यांच्या शरीरावर वाईट परिणाम होतो. काही खेळण्यांमध्ये असलेली ही तत्व आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असतात. यामुळे मुलांना गंभीर आजार होण्याचा धोका असतो.
हे आहेत धोके
1 मुलांच्या नर्वस सिस्टीमवर वाईट परिणाम
2 पॉलीविनायल क्लोराइड पीवीसीने तयार करण्यात आलेल्या या खेळण्यांमध्ये शीसे आणि कॅडमियम असते. जे नर्वस सिस्टिमवर वाईट परिणाम करते.
3 यातील न्यूरॉटॉक्सिस आणि नेफ्रोटॉक्सिस मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे मुलांच्या बौद्धिक क्षमतेवरही परिणाम होतो.
4 लहान मुलांच्या किडनी आणि लिव्हरवरही परिणाम होतो.
5 अनेक ब्रँडच्या खेळण्यांमध्ये शीसे आणि कॅडमियमसारखी विषारी तत्व आढळली आहेत.
6 मुले खेळणे तोडांत टाकतात, चावतात त्यावेळी खेळण्यांमधील हानिकारक तत्व त्यांच्या शरीरात जातात.