पावसाळ्यात वांगी खाल्ल्याने फंगल इन्फेक्शन होते दूर, ‘हे’ आहेत १२ फायदे 

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पावसाळ्यात बॅक्टेरिया आणि फंगल इंफेक्शनपासून बचाव करण्यासाठी वाग्यांमधील अँटीऑक्सीडेंट्स उपयोगी ठरतात. वांग्यात आयर्न, कॅल्शियम असल्याने ते एनीमिया आणि संधिवातासारख्या आजारांमध्ये लाभदायक आहे. तसेच निकोटीनची मात्रा सुद्धा असल्याने स्मोकिंगची सवय सुटू शकते. वांगी खाण्याचे १२ फायदे जाणून घेवूयात.

* यामध्ये अँन्टीऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असल्याने इन्फेक्शनची शक्यता खूप कमी होते.

* यामुळे बॅड कोलेस्टेरॉलची लेव्हल कमी होते. यामुळे हृदरोगापासून बचाव होतो.

* यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्याने उशीरापर्यंत भूक लागत नाही. तसेच वजन कमी होते.

* वांगे डाययुरेटिक असल्याने युरीनच्या समस्या दूर करते.

* यात क्लोरोजेनिक अ‍ॅसिड असते, जे बॉडीची इम्यूनिटी पॉवर वाढवते.

* यातील व्हिटॅमीन सी मुळे वाढत्या वयाचा प्रभाव दिसून येत नाही.

* त्वचा अधिक तजेलदार होते.

* यातील आयर्न एनिमीया दूर करते.

* सोडियम कमी प्रमाणात असल्याने स्ट्रोक टाळता येतो.

* वांग्यात कॅल्शियम भरपूर असल्याने मसल्स मजबूत होतात. तसेच संधीवाताचा त्रास दूर होतो.

* यात मर्यादित निकोटिन असल्याने स्मोकिंगची सवय सुटू शकते.