आरोग्यनामा ऑनलाइन टीम – चूकीचा आहार आणि बदललेली जीवनशैली यामुळे पुरुषांमध्ये इन्फर्टिलिटीची समस्या सर्वत्रच आढळून येत आहे. ही समस्या वेगाने वाढत चालली आहे. ही समस्या दूर करायची असल्यास आहार आणि जीवनशैलीमध्ये काही बदल करणे गरजेचे आहे. असे केल्यास फर्टिलिटीची संधी वाढू शकते. तसेच स्पर्म काउंट आणि क्वालिटीमध्ये सुधारणा होऊ शकते. ही संधी कशी वाढवावी याविषयी जाणून घेवूयात.
हे उपाय करा
१ रोज भोपळ्याच्या बिया खाव्यात. यातील आमेगा-३ फॅटी अॅसिड टेस्टोस्टेरोन आणि स्मर्प काऊंट वाढवते.
२ रोज सकाळ, संध्याकाळ केळी खावे. यातील ब्रोमिलेन नामक एंजाइम आणि व्हिटॅमिन बी स्टॅमिना वाढवते. स्पर्म काऊंट आणि एनर्जी वाढवते.
३ डार्क चॉकलेट खावे. यातील एलअरजिनायीन नामक अमिनो अॅसिड स्पर्म व्हॉल्यूम आणि क्वालिटी वाढवते.
४ टोमॅटो ऑलिव्ह ऑइलमध्ये परतून खा. यातील लियकोपिन स्पर्म काऊंट, क्वालिटी वाढवते.
५ नाष्ट्यामध्ये रोज दोन अंडी खा. यातील प्रोटीन आणि व्हिटॅमिनमुळे हेल्दी स्पर्म आणि स्पर्म प्रॉडक्शनसाठी चांगले असते.
६ रोज डाळिंबाचा एक ग्लास ज्यूस प्या. स्पर्म काऊंट आणि क्वालिटी वाढते.
७ रोज सलादमध्ये गाजर खा, गाजर ज्यूस प्या. यातील व्हिटॅमिन ए स्पर्म काऊंट वाढविण्यास मदत करते.
८ रोज जेवणात पालक सूप अथवा पालकची भाजी खा. यातील फॉलिक अॅसिडमुळे स्पर्म क्वालिटी आणि शेप सुधारतो.
९ रोज तीन ते चार लसणाच्या पाकळ्या चावून खा. यातील एलिसिन नामक कंपाऊंड मेल ऑर्गनमधील रक्तप्रवाह वाढवते.
१० रोज मुठभर आक्रोड खा. यातील आमेगा ३ अॅसिड मेल ऑर्गनमधील रक्तप्रवाह वाढवते.