आरोग्यनामा ऑनलाईन- दात किडणे आणि कीड जमा होणे यामुळे दातदुखी(toothache) होते. बर्याच वेळा गरम किंवा थंड गोष्टींचे सेवन केल्यावर दातदुखी होण्यास सुरूवात होते. दातदुखी(toothache) टाळण्यासाठी दात स्वच्छ करणे हा सर्वात अचूक मार्ग आहे. आपल्याला दातदुखी असल्यास, काही घरगुती उपचारांचा अवलंब करून वेदनापासून आराम मिळू शकतो.
१) आले
वर्षानुवर्षे आले औषध म्हणून वापरले जात आहे. आल्यामुळे हानीकारक किटाणूपासून बचाव होतो तसेच दातदुखी देखील दूर करते. यासाठी आल्याचे मिश्रण बनवून किडलेल्या भागावर लावा. आपण आल्याचा एक छोटा तुकडा चघळू देखील शकता.
२)लवंग
लवंगामध्ये औषधी गुण आहेत. यामुळे दातदुखी कमी होते. दातातील सणसण कमी करते. लवंगामध्ये युगेनोल नावाचा एक घटक असतो. जो नैसर्गिक एंटीसेप्टिक म्हणून कार्य करतो. कापसामध्ये लवंगतेलाचे काही थेंब घाला आणि दुखत असलेल्या भागावर लावा. यामुळे त्वरित आराम मिळेल.
३)ओवा
ओवा वापरल्याने दातदुखीपासून आराम मिळतो. त्यात अँटीबैक्टीरियल आणि अँटीऑक्सिडेंट घटक आहेत. जे दातातील हानिकारक जीवाणू नष्ट करतात. ते वापरण्यासाठी आपण कापसावर ओवा तेलाचे काही थेंब घेऊन त्यात दोन थेंब पाणी मिसळा नंतर बाधित भागावर लावा. हे आपल्याला लवकरच विश्रांती देईल.
४) टी बॅग
टी बॅगफक्त चहा बनवत नाहीत तर त्यामध्ये असलेले घटक दातदुखीमध्ये आराम देखील देतात. त्यामध्ये टॅनिन नावाचा घटक वेदना कमी करतो आणि जळजळ कमी करतो. यासाठी टी बॅग घ्या आणि अर्धा कप पाण्यात भिजवा. त्या नंतर टी बॅग प्रभावित दातावर ठेवा.
५)ऑलिव्ह ऑईल
फिनोलिक कंपाऊंड ऑलिव्हमध्ये असते. दातदुखीमध्ये याचा उपयोग केल्याने वेदना कमी होते. यासाठी, आपण कापूस घेऊन ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब टाकून, नंतर ते दातावर लावा. घरगुती उपचारांमुळे दातदुखीचा त्रास कमी होत नसेल तर, त्यास हलके घेऊ नका आणि एखाद्या चांगल्या दंतचिकित्सकाशी संपर्क साधा.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.