• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home तज्ज्ञांचं मार्गदर्शन

दातांवरून जाणून घेता येऊ शकते , तुमचे आरोग्य किती चांगले

by Nagesh Suryawanshi
June 24, 2019
in तज्ज्ञांचं मार्गदर्शन
0
Teeth &Tongue
6
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – दाताचा पांढरा किंवा जिभेचा गुलाबी रंग यावरून व्यक्तीचे आरोग्य ओळखता येऊ शकते. याच दातांवर अथवा ओठांवर झालेला कोणत्याही प्रकारचा बदल शरीराची कमतरता दर्शवतो. दात आणि जिभेचा टेक्शचर आरोग्याशी संबंधित समस्यांचा संकेतही असतो. यासाठी दातांवर आढळणारी लक्षणे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. कोणते लक्षणे कोणत्या आरोग्य समस्येशी संबंधित आहे, हे ओळखता आले तर उपचार करण्यासाठी ते उपयोगी ठरते.

दिवसातून दोनवेळा ब्रश करणे आणि नियमितपणे जीभ स्वच्छ करणे पुरेसे नाही. तज्ज्ञांच्या मते वर्षातून एक-दोन वेळा डॉक्टरांकडून दात तपासून घेणे खूप आवश्यक आहे. जेणेकरून कोणत्याही प्रकारची कोरल समस्या उद्भवल्यास माहीत पडेल. पांढरे दात आकर्षक स्माइलसाठी आवश्यक असतात, परंतु सामान्यापेक्षा अधिक पांढरे दात निरोगी असतात, हा भ्रम कदापि ठेवू नये. शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे असे होते. दाढेचा वरचा भाग चपटा, कापलेला किंवा घासलेला असेल तर हा तणावग्रस्त असल्याचा संकेत आहे. साधारणत: राग येणे, चिडचिड होणे किंवा तणाव असल्यावरच व्यक्ती दातांना कराकरा चावत असते.

गर्भावस्थेत हिरड्या लाल होणे, फुगणे किंवा त्यात सूज येणे सामान्य बाब आहे. जेव्हा हिरड्या दात सोडायला लागतात तेव्हा दातांचे मूळ खुलायला लागते. हे पिरियोडोंटल डिसीजचे लक्षण आहेत. तसेच हे मधुमेह, कार्डियोवेस्क्युलर आणि श्वासासंबंधी समस्या उद्भवण्याचे पूर्व संकेत असू शकतात. हिरड्यातून लागोपाठ रक्तस्राव होत असल्यास हा ल्युकेमियाचा संकेत असू शकतो. त्यामुळे याकडे कानाडोळा करण्याची चूक करू नये. तसेच गालांच्या आतील त्वचेवर भुरक्या रंगाचे डाग दिसून आले तर हा एडिसन आजार असू शकतो. हा एक प्रकारचा हार्मोनल डिसऑर्डर आहे. तसेच एखादा फोड किंवा जखम झाल्यावर त्याकडेही कानाडोळा करू नये.

AAAAAAAAAAAAAA

कारण हा कॅन्सरही असू शकतो.जर जिभेवर गदड लाल रंगाचे डाग असले तर हे शरीरात व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता असल्याचा संकेत आहे. जर तुमच्या जिभेचा टेक्श्चर स्ट्रॉबेरीसारखा आहे म्हणजेच लाल जिभेवर डॉट्स दिसत असतील तर हा रक्त वाहिन्यांमध्ये सूज येण्याचा संकेत आहे. जिभेला फोड येणे हे सारकॉइडॉसीसचे सुरुवातीचे लक्षण आहे. तसेच अंगाला सूज येण्याचाही हा संकेत असू शकतो. तोंड कोरडे पडणे वास्तविकरीत्या एक प्रकारचा साइड-इफेक्ट आहे. हा दुष्परिणाम एखाद्या औषधाच्या सेवनामुळेही होऊ शकतो. तसेच हे मधुमेह आणि ऑटो इम्युन डिसीजसह अर्थरायटिस व लिंफोमाचेही लक्षण असू शकतात.

हिरड्यांमध्ये संसर्ग होत असल्यास हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता दुप्पट असते. तोंडातील हानिकारक बॅक्टेरिया सहजपणे हृदय वाहिन्यांमध्ये असलेल्या फॅटी प्लाकला चिकटतात आणि रक्तप्रवाह बाधित करण्यासाठी जबाबदार ठरतात. ज्यांना हिरड्यांशी संबंधित संसर्ग असतो त्यांना अल्झायमर होण्याची शक्यता अधिक असते. तज्ज्ञांच्या मते हिरड्या किंवा दातांमध्ये असलेले बॅक्टेरिया क्रोनियल नव्र्ह मधून मेंदूपर्यंत पोहोचतात आणि अल्झायमर होण्यास कारणीभूत असलेल्या प्लाकची निर्मिती करतात. ज्या गरोदर महिलांना दात किंवा हिरड्याशी संबंधित समस्या असतात त्यांना बाळंतपणापर्यंत अधिक त्रासाचा सामना करावा लागतो. जर्नल ऑफ पेरिओडोंटोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, श्वासासंबंधी असलेल्या क्रोनिक अँब्सट क्टिव्ह पल्मोनरी डिसीज आणि न्युमोनिया यासारख्या आजारांचा धोका हिरड्यांच्या संसर्गामुळे वाढतो.

Tags: arogyanamadoctorhealthMadhuTeethTongueआरोग्यआरोग्यनामाजिभडॉक्टरदातमेंदू
Previous Post

आता दम्याची चाचणीही करता येते ‘ऑनलाइन’, अशी आहे पद्धत

Next Post

थकवा कशामुळे येतो, जाणून घ्या यामागील कारणे

Next Post
Fatigue

थकवा कशामुळे येतो, जाणून घ्या यामागील कारणे

bodybuilding
फिटनेस गुरु

20 minute HIT workout: ‘हा’ 20-मिनिटांचा तीव्र व्यायाम आपली फिटनेस (आणि अहंकार) तपासणीत ठेवेल

by omkar
February 24, 2021
0

आरोग्यनामा ऑनलाईन- जेव्हा मोकळी होण्याची वेळ नसते तेव्हा आपल्या workouts ला तीव्रतेच्या नवीन पातळीवर घेऊन जाणे आवश्यक असते. 30 मिनिटांपेक्षा...

Read more
coronavirus india

Pune confirms shocking figure of covid-19 | पुण्यातून कोरोनाचा धक्कादायक आकडा समोर

February 24, 2021
makeup

अभिनेत्री रेखाच्या सौंदर्याचा ‘राज’, मेकअप अन् घरगुती उपाय नव्हे जवान स्किनचं ‘गुपित’

February 24, 2021
face pack

झेंडूच्या फुलांपासून बनवा घरगुती फेस ‘पॅक’, हिवाळयात स्किन नाही होणार ‘ड्राय’

February 24, 2021
pink glow

‘हे’ 5 उपाय करून हिवाळयात देखील चेहर्‍याची गुलाबी ‘चमक’ ठेवा कायम, जाणून घ्या

February 24, 2021
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.