आरोग्यनामा ऑनलाईन टीम – काही महिलांना गर्भधारणा होण्यासाठी खूप समस्या असतात. अनेक उपचार घेऊन आणि गोळ्या खाऊनही त्यांना आई बनण्याचं सुख मिळत नाही. काही महिलांचे वय जास्त होते. त्यामुळे त्यांच्या शरीरात गर्भधारणा होण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे या अवस्थेत महिलांनी गोळ्याचे सेवन कमी करावे आणि गर्भधारणेसाठी काही घरगुती उपाय करावेत. असा सल्ला तज्न देतात. त्यामुळे तुम्हाला जर लवकरात लवकर आई व्हायचे असेल तर तुम्हाला या खालील टिप्स खूप उपयोगी ठरतील.
१) बडीशेप :
गर्भधारणा होण्यासाठी बडीशेप हा एक चांगला घरगुती उपाय मानला जातो. कारण बडीशेप महिलांच्या गर्भाशयाला स्वच्छ करण्याचे काम करते. त्यामुळे महिलांचे प्रजनन तंत्र सुरळीत होते. आणि प्रेग्नेंट होण्याची क्षमता वाढते. तसेच बडीशेपसोबत जर तुम्ही तूप खाल्लं तर तुमची गर्भधारणा करण्याची ताकद वाढते. त्यासाठी तुम्ही बडीशेपची पेस्ट करून ठेवा आणि त्यात तूप मिस्क करून सलग तीन महिने सकाळी काहीही न खाता खा.
२) खजूर :
खजूरमध्ये व्हिटामिन ए, बी, ई आणि मिनरल्स असतात. यामुळे आपल्याला गर्भधारणा होण्यासाठी मदत होते. गर्भधारणा होण्यासाठी १० ते १२ खजूर २ चमचे धण्यामध्ये बारीक करून घ्या. ही १ कप गाईच्या दुधात टाकून उकळून घ्या. असे मिश्रण मासिक पाळीनंतर एका आठवड्यापर्यंत घ्या. यामुळे तुमच्या प्रजनन क्षमतेत सुधार होतो.
३) डाळिंब :
लवकर गर्भधारणा होण्यासाठी डाळिंब हा चांगला उपाय आहे. डाळींबामुळे पेल्विक क्षेत्रामध्ये सुधारणा होण्यास मदत होते. याचा महिलांची प्रजनन शक्ती वाढवण्यासाठी मदत होते. त्यासाठी तुम्ही डाळिंबाच्या झाडाची साल आणि डाळींबाची साल एकत्र करून त्याची पेस्ट करा. आणि काही आठवडे रोज अर्धा चमचा हे मिश्रण घ्या. यामुळे लवकर गर्भधारणा होण्यास मदत होईल.