आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बॉडी बनविण्यासाठी जीममध्ये जाऊन तासनतास घाम गाळण्याची गरज नाही. उलट यामुळे फायद्याऐवजी नुकसानसुद्धा होऊ शकते. चांगली बॉडी बनवायची असेल तर व्यायामसह काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यावे. या गोष्टी कोणत्या हे जाणून घेवूयात.
हे लक्षात ठेवा
१) व्यायाम करताना तहान लागल्यास पाणी पिण्याचा प्रयत्न करावा. शरीर हायड्रेट राहणे गरजेचे असते. यामुळे शरीराला उर्जा मिळते.
२) पुरेशी झोप आणि आराम करणे गरजेचे आहे.
३) फक्त बॉडी बनविण्याकडे लक्ष न देता वाढलेले वजन अगोदर कमी करावे. यासाठी व्यायाम करा अथवा घरगुती उपाय करा.
४) व्यायामासह चांगला आहार घ्या. आहारात प्रोटीन, मिनरल्स, विटॅमिनयुक्त पदार्थांचा समावेश करा.
५) मसल्ससाठी फ्री वेट एक्झरसाइज करा. यामुळे अधिक परिणाम दिसून येतो.