आरोग्यानामा ऑनलाईन टीम : वजन वाढविण्यासाठी प्रथम स्नायुंच्या बळकटीसाठी योग्य व्यायाम केला पाहिजे. दिवसांतून दोन वेळा भरपूर जेवण्यापेक्षा थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने ५-६ वेळा खाल्ले पहिजे. वजन वाढवायचे असल्यास आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा हे आपण जाणून घेणार आहोत.
हे पदार्थ खा
चिकन
शंभर ग्राम चिकनमधून २५ ग्राम प्रोटिन्स मिळू शकतात. महिनाभर नियमित चिकन सेवन केल्यास परिणाम दिसून येतो.
अंडी
अंडी खाल्ल्याने शरीराला उच्च प्रतीचे प्रोटिन्स मिळतात. १०० ग्राम अंड्यातून सुमारे १३ ग्राम प्रोटिन्स मिळतात. यात व्हिटामिन ए व बी १२ मिळते.
सुकामेवा
काजू, बदाम, अक्रोड, किसमिस याचे सेवन करावे. सुक्यामेव्यातून शरीराला अधिक कॅलरीज व पोषणद्रव्ये मिळतात.
ओट्स
ओट्स चा आहारात वापर करा. १०० ग्राम ओट्समधून १७ ग्राम प्रोटिन्स मिळतात. शरीराला लोह मिळते.
बटाटा
वजन वाढवण्यासाठी आहारात किमान ४० टक्के कर्बोदक असलेले पदार्थ घ्या. आहारात बटाट्याचा समावेश करा. यात ग्यूटामिन व अजीर्नीन यासारखी अमिनो अॅसिड असतात. शक्यतो सालीसकट वापर करा.
सोयाबीन
१०० ग्राम सोयाबीन सेवनाने ३६ ग्राम प्रथिने मिळतात. सोयाबीनचा रोजच्या आहारात समावेश करा.
नुडल्स
नुडल्समधून कबोर्हायड्रेट व कॅलरीज मिळतात. यात भाज्या टाकून खाल्याने अनेक पोषणद्रव्ये, व्हिटामिन्स व अॅन्टीऑक्सिडन्ट मिळतात.
लोणी
लोण्याचा आहारात समावेश करा. लोण्यातून भरपूर मेद मिळते. १०० ग्राम लोण्यातून ८१ ग्राम मेद मिळते.
दूध
यात प्रोटीन्स व कर्बोदके तसेच इतर पोषणद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे दुधाच्या सेवनाने वजन वाढण्यास मदत होते.
केळ
वजन वाढवण्यासाठी केळ खा. एका केळ्यातून १०५ कॅलरीज मिळतात.
Visit : arogyanama.com