आरोग्यनामा ऑनलाईन टीम : आपल्या आरोग्याची काळजी आपणच योग्यप्रकारे घेऊ शकतो. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आयोग्याच्याबाबत अनेक गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे सतत थकवा, अशक्तपणा जाणवतो. त्यामागे अनेक कारणे असतात. ज्यात आपल्या रोजच्या दिनचर्येमधील काही गोष्टी असतात. ज्यात झोप, योग्य आहार, शरीरात पाण्याचे प्रमाण अशा अनेक गोष्टी येतात. या गोष्टी आपल्या शरीरातील वरवरच्या गोष्टींनी येणारा अशक्तपणा येतो. पण गंभीर घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आपल्या शरीरातील हिमोग्लोबीन कमी झाले की अशक्तपणा येतोच.
शरिरातील हिमोग्लोबीन कमी झाले की अशक्तपणा येतोच. त्यासोबत अनेक समस्यांना अनेक शरीरासंबंधी त्रासांना आमंत्रण दिले जाते. शरीरातील हिमोग्लोबिन कमी झाले की त्यामुळे बीपी लो होण्याच्या समस्या देखील सुरु होतात. त्यामुळे अधिकच त्रास होतो.
अशक्तपणा, बीपी लो होणे या समस्येपासून दूर राहण्यासाठी शरीरातील हिमोग्लोबीन वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी कोणते उपाय करायचे हे आपल्याला माहित पाहिजे.
हिमोग्लोबीन वाढवण्याचे उपाय
१. डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणाक कॅल्शिअम आणि लोहाचे प्रमाण असते. त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचा स्तर वाढविण्यास मदत होते. तसंच डाळिंबाने रक्तपेशींमध्येही वाढ होते. त्यामुळे आपल्या आहारात डाळिंबाचा समावेश करणे अधिक गरजेचे आहे.
२. बीट हे कंदमूळे अधिक गुणकारी असते. बीटमध्ये लोह आणि फॉलिक अॅसिडचे प्रमाण अधिक असते. बीट आहारात असणेही अधिक आवश्यक आहे. त्यामुळे हिमोग्लोबिनचा स्तर वाढतो. तसंच शरीरातील रक्त वाढण्यासही मदत होते.