आरोग्यनामा ऑनलाइन टीम – प्रत्येक क्षण आनंदाने आणि समाधानाने जगण्यासाठी तुमच्यात पॉझिटिव्ह एनर्जी असणे गरजेचे आहे. अन्यथा प्रत्येकवेळी तुमच्या मनात निगेटिव्ह विचारच येऊ शकतात. यामुळे जगण्याचा आनंदही तुम्ही मिळवू शकणार नाही. संकटांचा सामना करताना, संघर्ष करताना, आपल्या शरीरात निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते. अशा वेळी पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करण्याची कला तुम्हाला अवगत झाली तर तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकता. पॉझिटिव्ह एनर्जी कशी निर्माण करावी, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
हे लक्षात ठेवा
१. रोजचा दिवस शांततेने सुरू करण्याचा प्रयत्न करा.
२. नियमित ध्यानधारणा करा.
३. स्वत:च्या शरीराला, मनाला रिलॅक्स ठेवा.
४. रिलॅक्स राहण्यासाठी संगीत ऐका. हे संगीत पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करते. ताणतणाव दूर करते. उर्जा देते.