आरोग्यनामा ऑनलाईन- सध्या कोरोना काळात बहुतांश लोक सकाळी गरम पाणी पित आहेत. खरं तर ही सवय खुप चांगली आहे. केवळ कोरोना काळातच नव्हे, तर नियमिती सकाळी गरम पाणी प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. त्यासोबतच योग्य प्रमाणात पाणी पिल्याने तुमच्या ऊर्जेतही वाढ होत राहाते. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने घाम आणि लघवीच्या माध्यामातून शरीरातील टॉक्सीन बाहेर पडतं. यामुळे किडनी स्टोनसारख्या समस्या होणार नाहीत. सकाळी उठल्यानंतर ब्रश करावा, आणि त्यानंतर एक ग्लासभर गरम पाणी प्यावे. या पाण्यामुळे कोणते फायदे होतात, ते जाणून घेवूयात…
गरम पाणी पिण्याचे फायदे
1 वेळेच्याआधीच म्हातारपण येण्याची समस्या सध्या वाढली आहे. ही समस्या नको असेल तर सकाळी उठून रोज गरम पाणी नक्की प्या.
2 रोज सकाळी गरम पाणी प्यायल्याने कफ, वात आणि पित्तसारख्या समस्याही होत नाहीत.
3 सकाळी लवकर उठून गरम पाणी प्यायल्याने पचनक्रिया संतुलित राहते. जेवण लवकर आणि सहज पचते.
4 गरम पाणी त्वचेसाठी रामबाण उपाय आहे. गरम पाण्यामुळे त्वचेसंबंधी अनेक समस्यांपासून सुटका मिळते.
5 सकाळी कोमट पाणी पिल्याने शरीराचे वजन नियंत्रित राहते. यामुळे शरीरातील तापमान वाढण्यासही मदत मिळते.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.