आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काही चुकीच्या सवयींमुळे वार्धक्य खुप लवकर तुम्हाला गाठू शकते. यासाठी वाईट सवयी ताबडतोब सोडाव्यात. सतत एनर्जी ड्रिंक घेतल्यानेही वय वेगाने वाढते. वाढत्या वयाची लक्षणे कमी करायची असल्यास खारट पदार्थ खाणे सुद्धा टाळले पाहिजे. तसेच प्रोसेस्ड फूड, बेकरी प्रॉडक्टसही खावू नये.
हे पदार्थ टाळा
१) दारूचे व्यसन असल्यास ते बंद करावे. क्वचित घेत असाल तर ठिक आहे. पण, प्रमाण जास्त असल्यास हे व्यसन बंद केलेलेच बरे.
२) जास्त प्रमाणात मीठ असलेले पदार्थ आवर्जून टाळा.
३) प्रोसेस्ड फूड टाळायलाच हवे.
४) जास्त प्रमाणात कॉफी घेत असाल तर वार्धक्याकडे लवकर वाटचाल करा. कॉफी चांगली आहे, परंतु, ती योग्यप्रमाणात प्या.
५) हेल्थ ड्रिंक्स खूप वेगाने आपल्याला वृद्ध बनवते. यातील साखर दातावर आणि त्वचेवरही विपरित परिणाम करते.
६) बेकरी प्रॉडक्ट्समुळे सुरकुत्या वाढतात. यातील साखर आणि फॅट्समुळे वजन वाढते. दातही खराब होतात.
७) साखर आणि साखरेचे पदार्थ टाळा. गरजेपेक्षा जास्त साखर म्हातारपणाला निमंत्रण देते. त्वचेवर वाईट परिणाम होतो.
८) ओट्स, पास्ता यासारखे पदार्थ हळूहळू वृद्धत्वाकडे घेऊन जातात. त्वचा निस्तेज होतात.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)