आरोग्यनामा ऑनलाइन टीम – महिलांच्या जीवनात गर्भधारणा हा एक सुखद अनुभव असतो. परंतु, कधी-कधी मिसकॅरेजमुळे या आंनदावर विरजन पडते. शिवाय, असे अनुभव आल्यास महिलांना सतत मिसकॅरेजची भीती वाटत असते. अनेक महिला मानसिकरित्या खचतात. परंतु, मिसकॅरेज हा एक अपघात असून काही घरगुती उपायांनी तो टाळता येऊ शकतो.
हे उपाय करा
सात्विक आहार
अशा महिलांनी सात्विक आहार घ्यावा. अती तेलकट, तिखट व तामसी आहार घेवू नये. निरोगी, आनंददायी आणि पोटाला आराम देणारा आहार घ्यावा. वेळेवर जेवण करावे.
धावपळ टाळा
गर्भधारणेदरम्यानच्या दरम्यान धावपळ टाळा. नाईट शिफ्ट अथवा रात्री उशीरापर्यंत काम करू नका. शरीरातील पित्तप्रकृती देखील उत्तम असणे गरजेचे असते.
स्वत:कडे लक्ष द्या
गर्भधारणेसाठी स्वत:कडे लक्ष द्या. रात्री वेळेवर झोपा. कामाचे नियोजन करा. पोटाच्या काही तक्रारी तर नाहीत ना, याकडे वेळीच लक्ष द्या.
व्यायाम करा
डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्भारपणात हलके व्यायाम करा. ४५ मिनीटे चालणे, ५ ते १० मिनीटे योगासने करु शकता. यामुळे शरीर निरोगी व मन शांत होते.
डिटॉक्सिफीकेशन जरूरी
बाळासाठी प्रयत्न करण्यापुर्वी एखाद्या आयुर्वेदिक तज्ञाचा सल्ला घेवून डिटॉक्सीफिकेशनने शरीरप्रकृती व त्यामधील त्रिदोष समजून घ्या. गर्भधारणेसाठी पंचकर्म उपचार घेऊन शरीरात निर्माण झालेले टॉक्सिन्स बाहेर टाकणे खूप गरजेचे असते.