अ‍ॅलर्जीपासून दूर राहण्यासाठी नेहमी लक्षात ठेवा ‘या’ लहान गोष्टी

Allergy

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अ‍ॅलर्जीचा त्रास अनेकांना असतो. हा त्रास टाळण्यासाठी कायम दक्षता घेणे गरजेचे असते. त्वचेला खाज येणे, वारंवार शिंका येणे, डोळे लाल होणे, ही अ‍ॅलर्जीची लक्षणे असू शकतात. अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास काही लोक त्याकडे फार गांभीर्याने पाहत नाहीत. मात्र, त्यामुळे अ‍ॅलर्जी कायम राहते. अ‍ॅलर्जीची लक्षणे आढळल्यास ताबडतोब उपचार केल्यास नियंत्रण मिळवता येऊ शकते.

धूम्रपानामुळे श्वसनप्रणाली संबंधित अ‍ॅलर्जी होण्याचा धोका जास्त असतो. ज्या व्यक्ती सिगारेट ओढून घरी जातात त्यापैकी ८० टक्के लोकांचे नातेवाईक कोणत्या ना कोणत्या अ‍ॅलर्जीने ग्रस्त असतात, असे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायरन्मेंट सायन्सच्या संशोधनात आढळून आले आहे. तसेच रात्री अंघोळ करणाऱ्या लोकांना फुप्फुसाची अ‍ॅलर्जी होण्याचा धोका दुप्पट होतो. दिवसा शरीराचे तापमान जास्त वाढलेले असते. यानंतर रात्री अंघोळ केल्याने फुप्फुसाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो, यामुळे ही अ‍ॅलर्जी होऊ शकते.

तसेच दारूचे प्रमाण वाढल्यास अ‍ॅलर्जीचा धोका वाढतो. जास्त दारू पिल्याने व्यक्तीमध्ये हिस्टेमनीसचे प्रमाण वाढते. यामुळे शिंका येणे, खाज होणे अशी अ‍ॅलर्जी होते, असा खुलासा डॅनिश रिसर्च संस्थेच्या शोधात करण्यात आला आहे. तर ओहिओ स्टेट कॉलेज ऑफ मेडिसिनच्या संशोधनानुसार कामाच्या ठिकाणी जास्त तणाव असल्यास आणि तणावात काम केल्यास अ‍ॅलर्जी होण्याचा धोका ५८ टक्क्यांनी वाढतो. ज्या व्यक्ती काम अर्धे झाल्यावर तणावग्रस्त होतात त्या अ‍ॅलर्जीला लवकर बळी पडतात.

त्वचेसंबंधी अलर्जीचा त्रास वारंवार होत असल्यास उकळत्या पाण्यात चादरी धुवाव्यात. चादरीतील जंतूमुळेच अनेक वेळा अलर्जी होते. चादरी गरम पाण्यात धुतल्याने अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता ३५ टक्क्यांनी कमी होते, असे दक्षिण कोरियामध्ये झालेल्या संशोधनात म्हटले आहे. तसेच घराच्या अंतर्गत भागात विविध प्रकारची रोपे लावल्यास अ‍ॅलर्जीपासून बचाव होऊ शकतो. ज्या लोकांच्या घरी रोपटी, झाडे असतात अशा व्यक्तींना अ‍ॅलर्जीचा धोका कमी असतो, असे बेल्जियममध्ये झालेल्या एका संशोधनात आढळून आले आहे.

‘त्वचा’ होईल तजेलदार आणि वाढेल ‘डोळ्यां’ची क्षमता, दररोज ‘हे’ करा

पावसाळ्यात ‘मेकअप’ करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

तुमच्या ‘आयब्रो’ चा रंग अधिक डार्क करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘गुळ’ या आजारांवर ठेवतो नियंत्रण

‘या’ पाच ‘फळा’चे सेवन केल्यानंतर ‘निद्रानाश’ होईल दूर

‘हे’ आहेत सॅलडचे ९ प्रकार, ‘कमजोरी’ दूर होऊन तब्येत होईल ठणठणीत

पालकाच्या भाजीचा रसही आहे ‘आरोग्यवर्धक’

डोळ्यातून सतत येणाऱ्या पाण्यासाठी करा ‘हे’ उपाय

‘दुधा’चा असा उपयोग केल्यास होतील ‘फायदे’च फायदे

८ आठवड्यांत घटवा वाढलेले ‘वजन’, ‘या’ आहेत विशेष टिप्स