आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सुरक्षित शारीरीक संबंधासाठी कंडोम हा सर्वात चांगला मार्ग आहे. परंतु, काही वेळा शरीर कंडोम ला नाकारते. यामुळे काही पुरुष आणि महिलांना अॅलर्जीचा त्रास होतो. अशा वेळी प्रायव्हेट पार्टच्या भोवताली खाज किंवा रॅशेज येतात.
हे लक्षात ठेवा
१) कंडोम ज्या घटकांपासून बनविण्यात येतो त्या घटकांची सुद्धा अॅलर्जी होते. यासाठी कोणत्या घटकांनी कंडोम तयार करण्यात आला आहे हे पहावे.
२) अॅलर्जीने रॅशेज आल्याने जळजळदेखील होते. त्वचा लाल होते.
३) अॅलर्जी झालेल्या ठिकाणी स्पर्श करु नका किंवा खाजवू नका.
या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. अन्यथा आजार गंभीर होऊ शकतो.
४) डोकेदु:खी, ह्रदयाचे ठोके वाढणे, श्वासाच्या तक्रारी आणि ओठ सुजणे, अशा समस्या होऊ शकतात.
५) त्वरित डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्या.