आरोग्यनामा ऑनलाईन टीम – गरोदरपणात महिलांनी व्यवस्थित काळजी घेणे आवश्यक असते. एखादी छोटीशी चूक देखील अशावेळी धोकादायक ठरू शकते. गरोदरपणात योग्य आहार, भरपूर झोप, व्यायाम आणि डॉक्टरांकडून चेकअप करणे गरजेचे असते. या काळात महिलांनी एखाद्या डायटेशियनकडून डायट चार्ट घेवून तो फॉलो करावा. बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे. या काळात डायजेसटिव्ह सिस्टिम कमजोर असते. त्यामुळे बाहेरचे पदार्थ खाताना ते ऑयली आणि अनहाइजेनिक नसावे.
अशी घ्या काळजी
* गरोदर महिलांनी सकाळ-संध्याकाळ फिरायला जावे. यामुळे पायांच्या मांसपेशी मजबूत होतात. यामुळे प्रसुतीच्या वेळी जास्त त्रास होत नाही.
* रिलॅक्स होण्यासाठी गरोदर महिलांनी पुस्तके वाचावीत. सकाळ संध्याकाळ पुस्तके वाचल्याने मूड फ्रेश होतो. हिंसा आणि जास्त भावनिक कथा वाचणे टाळावे.
* या काळात महिलांनी हलके संगीत ऐकावे. संगीत ऐकल्याने मुड फ्रेश होतो.
* गरोदर काळात महिलांनी पाठीवर जास्त काळ झोपू नये. पाठीवर जास्तकाळ झोपल्याने मणक्यावर दबाव पडतो. डाव्या कुशीवर झोपावे. डाव्या कुशीवर झोपल्याने शरिरात ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो.
* गरोदर महिलांनी स्मोकिंग आणि ड्रिंक करू नये. हे बाळासाठी घातक ठरु शकते. मद्याऐवजी फळांचा ज्युस प्यावा. या काळात कॉफी पिणे टाळावे.