वाढत्या वयाचा प्रभाव नष्ट करण्यासाठी तणावमुक्त रहा, फॉलो करा ‘या’ टिप्स

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – घरातील काम असो किंवा ऑफिसचे किंवा कोणत्याही इतर कारणामुळे टेन्शन घेऊ नका, कारण याचा थेट प्रभाव त्वचा आणि शरीरावर पडतो. चेहरा अकाली निस्तेज आणि सुरकुतलेला दिसण्यामागे अनेकेवेळा तणाव हे कारण असू शकते. तणावामुळे शरीरात कार्सिटोल हार्मोनचे प्रमाण वाढते, जे पेशींना नुकसान पोहचवते. म्हणून तरूण राहण्यासाठी नेहमी तणावमुक्त रहा. तसेच अन्य काही गोष्टींचीही काळजी घ्या.

ही काळजी आवश्य घ्या

* प्रथम अँटी एजिंग क्रीम लावणे बंद करा. त्याऐवजी ऋुतूनुसार मॉयश्चरायजरचा वापर करा.

* चेहरा वारंवार धुवू नका. चेहरा स्वच्छ करण्यासाठी क्लीन्जरचा उपयोग करावा.

* एजिंगची समस्या दूर करण्यासाठी क्रीम, लोशन किंवा एखाद्या सर्जरीची आवश्यकता वाटत असेल तर डॉक्टरशी संपर्क करा. ते त्वचेनुसार उपाय सांगू शकतात.

* कडक उन्हात बाहेर जाताना चेहरा झाकून बाहेर पडावे.

* सुरकुत्या वाढण्याचे एक कारण बॉडी हायड्रेट न ठेवणे हेसुद्धा आहे. त्वचेची कोमलता कायम ठेवण्यासाठी पाणी तसेच ज्यूस, नारळ पाणी या पेयांचे सेवन करत राहावे.

* सुंदर आणि दीर्घकाळ तरुण दिसण्यासाठी ८-९ तासांची झोप घ्या.

* सर्वप्रकारच्या व्यसनांपासून दूर रहा.

* दीर्घकाळ तरुण राहण्यासाठी पोषक आहार घ्या.

* फेसयोगा करा. यामुळे शरीर आणि मन निरोगी राहते.