आरोग्यनामा ऑनलाईन – चेहऱ्याच्या सौंदर्याबरोबरच केसांचीही काळजी घेणे आवश्यक आहे. यामुळे केस छान दिसतात आणि आत्मविश्वास वाढतो. फिटनेस तज्ज्ञ रुजूता दिवेकर कोणाला माही नाही? बॉलिवूड सेलेब्सची प्रशिक्षक होण्याबरोबरच ती तिच्या इंस्टाग्रामवर आरोग्य आणि सौंदर्याशी संबंधित टिप्सही सांगत असते. त्यांनी टाळू आणि घरगुती तेल आणि केसांची देखभाल आणि काळजी घेण्यासाठी ते कसे वापरावे याबद्दल सांगितले आहे. आपल्या व्हिडिओमध्ये ती असेही म्हणते की, जर आपण वजन कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करू शकतो. तर चेहऱ्याचे सौंदर्य टिकवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करुन काळजी घेतो मग टाळूच्या आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घेण्यात आपण सक्षम का होऊ नये? टाळूची त्वचा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. केसांची मालिश हे केसांचे पोषण करण्यात आणि संपूर्ण शरीराला शांत करण्यास मदत करते. यासाठी घरी खास तेल बनवण्यासाठी व ते लावण्याची पद्धत आणि त्याचे फायदे त्यांनी सांगितले आहेत.
डोळ्यांवर जमा झालेल्या कोलेस्ट्रॉलला हटविण्याचे ‘हे’ आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या
तेल तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य..
१) नारळ तेल – ३ चमचे
२) जास्वंद – १
३) मेथी दाणे – १ छोटा चमचा
४) हलीमचे बियाणे – १ छोटा चमचा
५) कढीपत्ता – ८-१०
६) लोखंडी कढई – १
तेल तयार करण्याची पद्धत
१) प्रथम तेल गरम करा. नंतर कढीपत्ता तळून
घ्या.
२) आणि आता त्यात हलीमचे बियाणे आणि मेथीचे दाणे घाला आणि २ मिनिटानंतर आचेवरून काढा.
३) शेवटी जास्वंद फुले घाला आणि झाकून ठेवा आणि रात्रभर तसेच सोडा.
तुमचे केस कधीही गळणार नाहीत, झोपेच्या आधी करा फक्त ‘या’ 6 गोष्टी
केसांची मालिशची पद्धत
१) हातांनी टाळूवर तेल लावा आणि हलक्या हातानी मालिश करा.
२) नंतर तुमच्या कानाभोवती बोटं फिरवा.
३) बोटांच्या साहाय्याने गळ्याच्या वरती टाळूची
मालिश करा.
४) हातावर थोडे तेल घेऊन टाळूच्या पुढील भागावर मालिश करा.
५) शेवटी आपल्या अंडरआर्म्स आणि छातीवर तेलाने मालिश करा.
केसांच्या मालिशचे फायदे
१) केसांना तेलाची मालिश केल्याने टाळूवरील घाण साफ होते आणि डोक्यातील कोंड्याची समस्या दूर होते.
२) मालिश रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत करते.
३) कोरडे आणि निर्जीव केसांचे पोषण होईल आणि यामुळे जास्त काळ ओलावा टिकून राहण्यास मदत होईल.
४) केस गळतीच्या समस्येपासून मुक्त व्हाल.
(चम्पी) (चम्पी) (चम्पी)
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.
Read more :
एका रात्रीतून दूर होईल अंडरआर्म्सचं काळेपणा, ‘हे’ आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या
डोळ्यांवर जमा झालेल्या कोलेस्ट्रॉलला हटविण्याचे ‘हे’ आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या
वयाच्या 30 नंतर महिलांनी ‘या’ 5 टीप्स फॉलो कराव्यात, आयुष्यभर तंदुरूस्त रहाल, जाणून घ्या
तुमचे केस कधीही गळणार नाहीत, झोपेच्या आधी करा फक्त ‘या’ 6 गोष्टी
Beauty Secrets : घरबसल्या न घाबरता Eyebrow ला परफेक्ट शेप, जाणून घ्या
घरच्या घरीच ‘या’ 3 गोष्टींपासून बनवा Hand Sanitizer, नाही होणार त्वचेला एलर्जी, जाणून घ्या प्रक्रिया
आपल्याला अचानकपणे उचकी का लागते? आईच्या पोटात असताना पासुनच होते सुरूवात, जाणून घ्या उपाय
डायटिंग केल्यामुळं हाडे कमकुवत होण्यासह होतात ‘हे’ 6 दुष्परिणाम, जाणून घ्या
‘या’ 6 चुकांमुळे गुडघे खराब होऊ शकतात, जाणून घ्या