आरोग्यनामा ऑनलाईन- हिवाळ्यात त्वचेच्या समस्यांना सामोरे(tips ) जावे लागते. हात वारंवार धुऊन कोरडे होतात. हात कोरडे, निर्जीव आणि काळे दिसू लागतात. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपाय(tips ) आहेत…
हर्बल हँडवॉश लावा
रसायनयुक्त हँडवॉशचा वारंवार वापर केल्याने हाताचा ओलावा कमी होतो. नैसर्गिक घटकांनी तयार केलेला हँडवॉश वापरा. या मुळे त्वचेतील ओलावा टिकून राहील व संसर्ग होण्याचा धोका राहणार नाही.
क्रीम लावा
अनेकदा हात वारंवार धुवावे लागतात. हातांच्या त्वचेमध्ये ओलावा ठेवण्यासाठी कोल्ड क्रीम, वेसलीन इत्यादी देखील लावू शकता.
मालिश उपयुक्त
हातांनी तेलाची मालिश केल्याने त्वचेला पोषण मिळेल. तसेच, रक्ताभिसारण चांगल्या प्रकारे झाल्यामुळे निर्जीव, कोरड्या त्वचेपासून मुक्तता होईल. तसेच हात स्वच्छ, चमकणारा आणि सुंदर दिसावा, यासाठी नारळ, बदाम, ऑलिव्ह किंवा कोणतेही नैसर्गिक तेल निवडू शकता.
मध आणि लिंबाने स्क्रब करा
आठवड्यातून एकदा मध-लिंबाचा रस मिसळून हात स्क्रब करा. या मुळे मृत त्वचा काढून टाकण्यास मदत होईल. तसेच, त्वचेला योग्य प्रमाणात ओलावा मिळेल.
कोरफड जेल
झोपायची वेळ होण्यापूर्वी एलोवेरा जेलने हातांना मालिश करा. हे त्वचेच्या कोरडेपणा दूर करेल. तसेच, हात स्वच्छ आणि सुंदर दिसतील.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.