गर्भातील बाळाचे वजन वाढवण्यासाठी ‘हे’ ६ उपाय करा, जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – गर्भावस्थेत असताना प्रत्येक महिलेला चिंता असते ती फक्त आपल्या पोटातील बाळाची. ते सुदृढ कसे होईल याचाच त्या विचार करतात. मुलं जन्माला आल्यानंतर त्याच्या वजनावरून त्याचे आरोग्य ठरवले जाते. त्यामुळे बाळाचे वजन कसे वाढेल याचा विचार प्रत्येक महिला करत असते. जाणून घ्या गर्भातील बाळाचे वजन वाढवण्यासाठी काही टिप्स –
१) अल्प आहार –
गर्भावस्थेत असाताना ७ व्या महिन्यात पोटातील बाळाचे वजन जलद गतीने वाढत असते. त्यावेळी सामान्यपणे शरीराला ४५० कॅलरीपेक्षा अधिक कॅलरीची गरज असते. ७ व्या महिन्यात बाळ वाढत असते. त्यामुळे पोटावर दाब येतो आणि पोटातील जठराची जागा कमी होते. त्यामुळे थोडे खाले तरी पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे स्त्रिया अधिकचे अन्न खाऊ शकत नाहीत. गर्भवती महिला आणि बाळाला पुरेशी ऊर्जा आणि पोषण मिळावे म्हणून स्त्रियांनी दर २-३ तासाला आहार घेतला पाहिजे. त्यामुळे पोटात दाबही येत नाही आणि ऊर्जाही मिळते.
२) पाणी –
गर्भावस्थेत पोटाच्या खालच्या भागावर गर्भाशयाचा दाब येतो, त्यामुळे त्यांना सतत लघवीला जावे लागते. तर पोटावर दाब आल्याने स्त्रिया अधिक पाणी पित नाहीत. परंतु शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी महिलांनी सतत थोड थोड पाणी पिणे आवश्यक आहे.
३) कॅल्शियम –
गर्भावस्थेत गर्भातील बाळाच्या हाडांचा विकास होत असतो. त्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. शरीरात कॅल्शियम वाढीसाठी स्त्रियांनी दूध, दही, पनीर, बदाम, अंजीर आणि कॅल्शियमच्या गोळ्या घेणे आवश्यक असते. गर्भावस्थेत असणाऱ्या महिलेला दिवसभरात १००० ते १३०० मिलीग्रॅम कॅल्शियम मिळणे आवश्यक असते. त्यामुळे कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत म्हणजे दूध आहे, त्याचा अर्धालिटर दूध आपल्या आहारात घेतले पाहिजे.
४) फॉलिक अॅसिड –
गर्भवती स्त्रियांचे हिमोग्लोबिन १२ ग्रॅमच्या पाहिजे असते. जर रक्तात हिमोग्लोबिन कमी झाले तर डॉक्टरांशी सल्ला घेऊन फॉलिक अॅसिडची आणि हिमोग्लोबिन लोहाची औषधे सुरु करावीत.
५) फायबर-
गर्भावस्थेत गर्भाशयावर दबावावर येण्याने महिलांना पोटात जळजळ आणि मुळव्याधीच्या समस्या होतात. या समस्यांना दूर ठेवण्यासाठी दिवसभरात ८-१० ग्लास पाणी आणि फायबरयुक्त आहार घ्यावा.
६) प्रोटीन –
गर्भावस्थेत शेवटच्या तीन महिन्यात गर्भाचे शारीरिक आणि मानसिक विकास जलद गतीने होत असतो. जन्माला येणाऱ्या मुलाचे शरीर आणि बुद्धीसाठी प्रोटीन आवश्यक असते. प्रोटीनयुक्त आहारात डाळी, सोयाबीन, सुकामेवा, दूध, दही, पनीर यांचा समावेश करावा. तसंच डायबिटीस नसेल तर दिवसात २-३ रसगुल्लेही खाण्यात असले पाहिजेत. त्यात प्रोटीन आणि कॅल्शियन दोन्हींचा समावेश आहे.
Comments are closed.