आरोग्यानामा ऑनलाईन टीम : बुटांच्या दुर्गंधीमुळे काही लोकांवर अनेकदा लाजिरवाणे प्रसंग ओढावतात. उन्हाळा, पावसाळा या दोन ऋतूमध्ये हा त्रास जास्त होतो. त्याचा इतरांनाही त्रास होतो. या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी काही खास घरगुती उपाय आहेत. हे सोपे उपाय जाणून घेवूयात.
हे उपाय करा
१ बेकिंग सोडा
रोज रात्री बुटात थोडा बेकिंग सोडा टाकून ठेवा. सकाळी तो साफ करा. यामुळे बुटातील बॅक्टेरिया आणि दुर्गंधी नष्ट होते.
२ फळांची साल
लिंबू, संत्री, मोसंबी यांसारख्या फळांची साल बुटांमध्ये टाकून ठेवा.
३ लॅव्हेंडर ऑईल
बुटात दोन थेंब लॅव्हेंडर ऑईल टाकून ठेवा. याच्या अँटीबॅक्टेरिअल गुणामुळे दुर्गंधी येणे बंद होते.
४ टी बॅग
उकळवून थंड केलेली टी बॅग काही वेळ बुटांमध्ये ठेवल्यास दुर्गंधी दूर होते.
Visit : arogyanama.com