आरोग्यानामा ऑनलाईन टीम : सिंकमध्ये अनेकदा भांडी घासताना वेगवेगळे पदार्थ अडकलेले असतात. त्यामुळे किचनच्या सिंकमधून दुर्गंधी येते. ही दुर्गंधी थेट नाकात जात असल्याने त्रासदायक ठरते. यामुळे आजार पसरण्याचीही भिती असते. ही दुर्गंधी दूर करण्यासाठी बाजारात अनेक उत्पादने असली तरी ती महागडी असतात. यासाठी घरच्याघरी काही सोप्या पद्धतीने ही समस्या दूर करणे सहज शक्य आहे. हे घरगुती उपाय कोणते आहेत, ते जाणून घेवूयात.
हे उपाय करा
1 बेकिंग सोडा
सिंकमध्ये थोडा बेकिंग सोडा टाका आणि 5 मिनिटांनंतर सिंक घासा. यामुळे त्यामधून येणारी दुर्गंधी दूर होते.
2 लिंबू
लिंबू आणि मिठाची एक घट्ट पेस्ट तयार करा. या पेस्टने सिंक स्वच्छ करा. यामुळे सिंक चमकदार होईल आणि दुर्गंधीही दूर होते.
3 व्हिनेगर
भांडी घासल्यानंतर व्हिनेगर आणि ब्रशच्या मदतीने सिंक चांगले घासा. यामुळे दुर्गंधी दूर होते.
Visit : arogyanama.com