आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वय वाढले की चेहऱ्याची चमक आपोआपच कमी होऊ लागते. विशेषत: तिशीनंतर हा फरक प्रकर्षाने जाणवू लागतो. महिलांच्या डोळ्यांजवळ आणि कपाळावर छोट्या छोट्या सुरकुत्या पडू लागतात. परंतु, काही घरगुती, सोपे उपाय केले तर वय वाढल्यानंतरही चेहरा पूर्वीप्रमाणेच सुंदर, आकर्षक आणि तजेलदार दिसू शकतो. हे उपाय आपण जाणून घेणार आहोत.
व्हिटॅमिन सी सीरम
हे खुप परिणामकारक अँटीऑक्सीडंट असून यामुळे त्वचा लवचिक होते आणि तिचा ग्लोही वाढतो. त्वचा प्रौढ दिसत असेल तर हा परिणामकारक उपाय आहे.
अँटी एजिंग क्रिम
त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी अँटी एजिंग क्रिम लावा. यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सीडेंट असतात. स्कीन डॅमेज होण्यापासून ते बचाव करतात.
फेस मास्क
त्वचेवर फेस मास्क एखाद्या जादुप्रमाणे काम करते. त्वचेला अनूरुप फेस मास्क लावा. यामुळे त्वचा मुलायम होते. आठवड्यातून २ वेळेस याचा वापर करा.
सनस्क्रीन
मुलींनी सनस्क्रीन क्रिम आठवणीने लावली पाहिजे. कारण उन्हामुळे त्वचा शुष्क, सावळी आणि प्रौढ दिसू शकते. घातक युवी सूर्यकिरणांपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी सनस्क्रीन क्रिम लावावी.
आयक्रीम
डोळ्याच्या आसपासची त्वचा संवेदनशील असल्याने वाढत्या वयाचा परिणाम सर्वात प्रथम येथील स्कीनवर दिसतो. या त्वचेकडे लक्ष दिले पाहिजे. या स्क्रीनवर आयक्रीम लावण्यास सुरुवात करा. यामुळे त्वचा पूर्णपणे मॉइश्चराइज होते.
फेशियल मिस्ट
थकवा आणि तणावासोबतच पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी होते. यापासून वाचण्यासाठी फेशियल मिस्ट लावा. यामुळे चेहरा उजळतो. तिशी ओलांडली असेल तर हे फार फायदेशीर ठरू शकते.
फेस स्क्रब
त्वचेवरील डेड स्कीन काढण्यासाठी फेस स्क्रबचा वापर करा. कोणतेही स्क्रब वापरु शकता. वाढत्या वयात त्वचेची नैसर्गिक चमक कमी होते. फेस स्क्रबमुळे ही चमक पुन्हा मिळते.