आरोग्यनामा ऑनलाईन टीम – नारळाच्या खोबऱ्यापासून तयार करण्यात येत असलेले खोबरेल तेल बहुगुणी आहे. याचे विविध उपयोग नैसर्गिक उपचारांसाठी केले जातात. शिवाय या तेलाचा वापर अन्नपदार्थांसाठी सुद्धा केला जातो. केस आणि त्वचेसाठी ते सर्वोत्तम आहे. परंतु, हे तेल वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे. यामुळे चयापचय यंत्रणा कार्यान्वित होत असल्याने पचनक्रिया चांगली होते. चरबीही सुद्धा कमी होते. खोबरेल तेलाने वजन कसे कमी करावे, याविषयी माहिती घेवूयात.
हे आहेत उपाय
* एक कप ग्रीन टीमध्ये एक चमचा खोबरेल तेल मिसळून प्यावे. यामुळे मेटाबॉलिज्म वाढून चरबी कमी होते.
* जेवणात खोबरेल तेलाचा वापर केल्यास मेटाबॉलिज्म वाढून डायजेशन सुधारते. चरबी कमी होते.
* एक-एक चमचा खोबरेल तेल आणि मध मिसळून प्यावे. यामुळे भूक नियंत्रित होते. वजन कमी होते.
* एक-एक चमचा खोबऱ्याचे तेल आणि लिंबाचा रस प्यायल्याने चरबी जलद कमी होते.