आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अनेकजण झोपले की थोड्या वेळात लगेच घोरायला लागतात. हे त्यांनाही समजत नाही. त्यांच्या शेजारी झोपलेली व्यक्ती मात्र खूप परेशान होते. घोरणे ही अनेक जणांची समस्या आहे. अनेक कारणांमुळे घोरण्याचा आजार होऊ शकतो. त्यामुळे काही सावधगिरी बाळगून आणि घरगुती इलाज करुन घोरण्यावर नियंत्रण आणता येऊ शकते. तुम्हाला जर तुमच्या घोरण्याच्या समस्येवर नियंत्रण मिळवायचे असेल तर खालील काही घरगुती उपायांनी तुम्ही घोरण्यावर नियंत्रण मिळवू शकता.
१) फॅनखाली झोपू नका –
तुम्ही जर घोरण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर फॅन किंवा एसी जवळ झोपू नका. कारण याची जास्त हवा जर आपल्या नाकात गेली तर आपल्या श्वास नलिका आकसतात. त्यामुळे तुम्ही घोरता.
२. भरपूर पाणी प्या :
कधी कधी आपल्या शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे नाक आणि गळ्यामध्ये कफ वाढतो. ज्यामुळे श्वास घेण्यात अडचण येते आणि घोरण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे दिवसभर ३-४ लिटर पाणी प्या.
३. योगा करा:
तुम्ही घोरण्याच्या समस्येने खूपच त्रस्त असाल तर ही समस्या दूर करण्यासाठी प्राणायम करा. यामुळे फायदा होईल.
४.आहारावर नियंत्रण ठेवा :
ज्या व्यक्ती जास्त घोरतात त्यांनी रात्रीच्या वेळी जास्त खाणे टाळा. आणि झोपण्याआधी कफ वाढवणारे पदार्थ, जसे की दुध, ऑयली फूड, चॉकलेट किंवा गोड खाऊ नका. यामुळे घोरण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
५) रक्तदाब नियंत्रणात ठेवा :
तुम्हाला तुमच्या घोरण्याच्या समस्येवर जर नियंत्रण मिळवायचे असेल आणि तुमचा रक्तदाब सामान्यांपेक्षा जास्त असेल तर यामुळे घोरण्याची समस्या होऊ शकते. त्यामुळे तुमचा रक्त दाब नियंत्रणात असावा.
६) वजन कमी करा :
घोरण्याची समस्या टाळण्यासाठी वजनावर नियंत्रण असणे खूप आवश्यक आहे. जास्त वजन असल्याने घोरण्याची समस्या होते.