आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सध्या लठ्ठपणा ही समस्या खूपच वाढत चालली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक जण वेगवेगळे डाएट आणि व्यायाम करत असतात. काही लोकांचा समज असतो, की अंडी खाल्ल्याने वजन वाढते, परंतु हे चूकीचे आहे. उलट अंडी खाल्ल्याने फॅट बर्निंग प्रोसेस वेगाने होते. डायटमध्ये नियमित अंडे सेवन केल्याने वजन लवकर कमी होते. यामुळे एका महिन्यात वजनात फरक पडल्याचे दिसते. परंतु, वजन कमी करण्यासाठी अंडी योग्य प्रकारे खाणे गरजेचे असते. अंडी खाण्याची ही पद्धत आपण जाणून घेणार आहोत.
अशी खा अंडी
१ अंडे उकडून खावे, यामध्ये कमी कॅलरीज असतात.
२ मिरपूड टाकून खाल्ले तर वजन लवकर कमी होते.
३ अंडे हाफ फ्राय करून खा. यामध्ये काळे मीठ टाका.
४ अंड्याच्या सफेद भागाचे ऑम्लेट बनवून खा.
५ ऑम्लेट बनविताना हळद पावडर टाका.
६ आम्लेटमध्ये भाज्या मिक्स करून खा.
७ यामध्ये जिरे मिसळल्याने लठ्ठपणा लवकर कमी होतो.
८ उकडलेले अंडे सलाडमध्ये मिक्स करून खा. यामध्ये दालचिनी पावडर मिसळल्यास वजन लवकर कमी होते.
किती अंडी खावीत
पुरुषांनी ३ अंडी विनायोकची, १ अंडे योकसोबत खावे. तर महिलांनी १ अंडे योकसोबत, १ अंडे विना योकचे खावे.
अंड्यासोबत हे खाऊ नका
१ अंड्यासोबत मटण खाऊ नका. कारण यामध्ये जास्त कॅलरीज असतात. वजन वाढू शकते.
२ अंड्यासोबत चीज खाऊ नका. कारण यामध्ये फॅट भरपूर प्रमाणात असते.
३ अंड्यासोबत हाय फॅट दूध अथवा दही घेणे टाळावे. यामुळे वजन वाढू शकते.