७ दिवसात आत जाऊ शकते पोट, ‘हे’ ११ उपाय आहेत ‘रामबाण’
हे उपाय करा.
१ जेवणात वरून मीठ घेऊ नये. परंपरागत मसाले वापरा. हे मसाले भाजण्यासाठी तेलाचा जास्त उपयोग करू नका.
२ पांढरे पदार्थ म्हणजेच बटाटे, मैदा, साखर, तांदूळ कमी करा आणि मल्टीग्रेन किंवा मल्टीकलर पदार्थ म्हणजेच डाळी, गहू, गजर, पालक, सफरचंद, पपई आदी खाण्यावर जास्त भर द्या.
३ नियमितपणे ब्रेकफास्ट केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. ब्रेकफास्टमध्ये नेहमी एकसारखे पदार्थ सेवन करू नका.
४ सदाफुली झाडाच्या मुळाचे चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये मध टाकून सेवन करा आणि त्यानंतर ताक प्या.
५ दररोज सकाळी एक ग्लास थंड पाण्यात दोन चमचे मध टाकून घेतल्यास शरीरातील वसा कमी होण्यास मदत होते.
६ पपईचे नियमित सेवन करा. पपईचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते.
७ दह्याचे सेवन केल्याने चरबी कमी होण्यास मदत होते. दिवसातून दोन-तीन वेळेस ताक प्यावे.
८ पिंपळाच्या सालीचे चूर्ण भाजून घ्या, दररोज तीन ग्रॅम हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास बाहेर आलेले पोट कमी होईल.
९ वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी टोन्ड दुध, टोन्ड दही आणि टोन्ड पनीरचा वापर करा. या पदार्थांमध्ये कॅलरी कमी असतात, परंतु पोट भरलेले जाणवते.
१० आवळा आणि हळद समान मात्रामध्ये बारीक करून चूर्ण तयार करा. हे चूर्ण ताकामध्ये टाकून घ्यावे. या उपायाने वजन जलद गतीने वजन कमी होऊ लागेल.
११ दररोज सकाळी आणि संध्याकाळी कमीत कमी ४ किलोमीटर चालावे. दुपारचे जेवण केल्यानंतर शतपावली करा. रात्री ८:३० नंतर जेवण करत असाल तर पोळी आणि भाताऐवजी डाळ आणि भाज्यांना जास्त प्राथमिकता द्या. रात्री हलका आहार घ्यावा.
Comments are closed.