आरोग्यनामा ऑनलाइन टीम – नेहमी सकारात्मक विचार मनात ठेवल्यास मानसिक आणि शारीरीक आरोग्य चांगले राहते. यासाठी प्रत्येक गोष्टीची कायम चांगली बाजूच बघावी. जर नकारात्मक विचारांनी डोक्यात ठाण मांडले तर सगळ्याच गोष्टी चुकीच्या घडायला लागतात. याचा मानसिक आणि शारीरीक आरोग्यावर वाईट परिणाम दिसून येतो. तसेच चिडचिडेपणा, किरकिर वाढत जाते. नकारात्मक विचार घालविण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
हे लक्षात ठेवा
१) मनात कायम निगेटिव्ह विचार असतील तर जरा पॉझिटिव्ह विचारांना त्यात जागा द्या.
२) काहीतरी क्रिएटिव्ह करा. चित्र काढा, मुलांशी गप्पा मारा, स्वयंपाकघरात लुडबुड करा, यापैकी काहीही करू शकता.
३) कामातून ब्रेक घ्या. फिरायला जा. बाहेरच्या जगाकडे, निसर्गाकडे आवर्जुन बघा.
४) निवांतपणे बसून कागद-पेन घेऊन आजूबाजूला पॉझिटिव्ह गोष्टी लिहून काढा. यामुळे आपल्या माणसांच्या चांगल्या गोष्टी लक्षात येतील.
५) जाणीवपूर्वक बॉडी लॅँग्वेजकडे लक्ष द्या. ताठ बसा. उत्साही असण्याचा प्रयत्न करा. यामुळे नकारात्मक विचार बाजूला जातील.
६) मरगळ झटकून टाका. चेहऱ्यावर उत्साह भासू द्या.
७) मनात साचलेल्या असंख्य गोष्टींना वाट मोकळी करून द्या. कारण या साचलेपणामुळे विचार नकारात्मक होतात. या गोष्टी कोणाकडे तरी बोला.
८) प्रत्येक गोष्टीची घाई योग्य नाही. मनही त्यामुळे त्याच वेगाने धावत असते. हे मन शांत करण्यासाठी केवळ एक मिनिट द्या. शांत बसा. मनाला जागेवर आणा. यामुळे वेगळीच अनुभुती येते.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)