आरोग्यनामा ऑनलाइन टीम – हाडे कमकुवत झाल्याने छोट्याशा अपघातातही होड मोडण्याचा धोका वाढतो. अशाप्रकारे अचानक शरीराच्या एखाद्या भागात फ्रॅक्चर झाल्यास तुमच्या कामावर आणि सर्वच व्यवहारांवर त्याचा विपरित परिणाम होतो. हे टाळण्यासाठी काही घरगुती उपाय करता येऊ शकतात. खाण्या-पिण्यामध्ये काही बदल केल्यास हाडे बळकट होऊ शकतात.
हाडे मजबूत करण्यासाठी प्रिझव्र्हेटिव्ह खाद्यपदार्थांचे सेवन करू नका. यामध्ये मोठय़ा प्रमाणात असलेल्या फॉस्फरसमुळे हाडे कमकुवत होतात. होडे कमकुवत असल्यास जास्त चालणे-फिरणे किंवा काम करणे टाळावे. जेणेकरून इतर समस्या किंवा दुखापतीचा धोका कमी करता येईल. सोडायुक्त आणि कॅफिनयुक्त पेय पदार्थांचे सेवन करू नका. अशा पदार्थांचे सेवन केल्यास रिकव्हरी होण्यास वेळ लागतो. जेवणात भरपूर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा समावेश असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.
यामुळे हाडांची झालेली झीज भरून निघते आणि स्नायू बळकट होतात. फ्रॅक्चर झाले असल्यास वजनदार सामान उचलू नये. यामुळे फ्रॅक्चर असलेल्या हाडावर अनावश्यक भार पडतो. आणि समस्या आणखी वाढण्याचा धोका असतो. हाडाला फ्रॅक्चर झाले असल्यास जोपर्यंत प्लास्टर काढले जात नाही तोपर्यंत नियमितपणे अननसाचे सेवन करावे. अननसात असलेल्या ब्रोमेलन एंझाइममुळे फ्रॅक्चर झालेल्या हाडाची सूज कमी होण्यास आणि हाडे बळकट होण्यास मदत होते. तसेच अशा स्थितीत डॉक्टर ब्रोमेलन सप्लिमेंट घेण्याचा सल्लाही देतात.