आरोग्यनामा ऑनलाइन टीम – धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि कामाच्या दबावामुळे मानसिक ताण येणे ही समस्या वाढत चालली आहे. याचे परिणाम आरोग्यावर आणि जीवनावर दिसून येतात. दैनंदिन काम योग्यप्रकारे नियंत्रित करता आले नाही तर मानसिक त्रास वाढत जातो. हे टाळण्यासाठी काही गोष्टींकडे खास लक्ष दिले पाहिजे. मानसिक ताण दूर करण्यासाठी काही सोप्या पद्धती असून त्यांची माहिती आपण घेणार आहोत.
हे उपाय करा
१ ताण असल्यास रोज पाच मिनिटे मौन ठेवा
२ तीन वेळा दिर्घ श्वास घ्या
३ हात पाय पसरवून दोन मिनिटे स्ट्रेचिंग करा
४ गार पाणी प्यावे
५ आवडीचे कोेणतेही शांत संगीत ऐका
६ मित्र अथवा कुटुंबासोबत वेळ घालवा
७ थोडा व्यायाम करा
८ या काळात हसण्याचा प्रयत्न करा
९ एखादे आवडीचे पुस्तक वाचा
१० सिगारेट, दारू पिऊ नका