आरोग्यनामा ऑनलाईन टीम – चमकदार, सिल्की केसांसाठी महिला विविध उपचार करत असतात. अनेक तेलांचा वापरही यासाठी केला जातो. केस कुरुळे आणि लहान असल्यास ते सरळ करण्यासाठी स्ट्रेटनरचा वापर केला जातो. मात्र, सततच्या ट्रीटमेंटमुळे केस रूक्ष आणि कमकुवत होतात. केसांना नुकसान न पोहोचवता ते सरळ करण्याचे काही साधे-सोपे घरगुती उपाय असून त्याची माहिती आपण करून घेऊयात.
हे उपाय करा
* एका स्प्रे बाटलीमध्ये पाणी आणि दुध समान प्रमाणत घ्या. हे मिश्रण संपूर्ण केसांवर स्प्रे करावे. त्यानंतर मोठे दात असलेल्या कंगव्याने केस विंचरून घ्या. हे मिश्रण एक तास केसांना लावून ठेवल्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कंडीशनरचाही उपयोग करा. या उपायाने केस सरळ होतील.
* नारळ पाण्यामध्ये थोडासा लिंबू रस मिसळा. हे मिश्रण एक दिवसभर फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर एक क्रिमी पेस्ट तयार होईल. ही पेस्ट चांगल्याप्रकारे केसांना लावून मालिश करा. त्यानंतर गरम टॉवलचा उपयोग करा. एक तासानंतर केस धुवून घ्या. आठवड्यातून तीन वेळेस हा उपाय केल्यास केस सरळ होतील.
* दूध आणि मध समान प्रमाणात एकत्र घेऊन, हे मिश्रण केस धुण्यापूर्वी एक तास अगोदर केसांना लावा. या उपायाने रुक्ष आणि कुरूळे केस सरळ होतील.
* नारळाचे तेल थोडेसे गरम करून केसांना लावून हलक्या हाताने मालिश करा. त्यानंतर गरम टॉवेलने डोके झाकून घ्या. या उपायाने केस चमकदार आणि सरळ होतील.
* दोन अंड्यांमधील पिवळा भाग चांगल्याप्रकारे फेटून घ्या. त्यानंतर या मिश्रणामध्ये दोन चमचे ऑलिव्ह ऑइल टाका. ब्रशच्या सहाय्याने हे मिश्रण केसांवर दोन तास लावून ठेवा. त्यानंतर शाम्पू लावून केस स्वच्छ धुवून घ्या. या उपायाने केस सरळ होतील.