आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सततच्या कॉम्प्युटर वापरामुळे आणि अधिक वेळ कॉम्प्युटरच्या स्क्रिनसमोर राहिल्याने जळजळ होणे , ड्रायनेस अशा डोळ्यांच्या अनेक समस्या निर्माण होतात. तुम्हाला दिवसभरात जास्तीत जास्त वेळ जर कॉम्प्युटरवर काम करावे लागत असेल तर डोळयांच्या आरोग्यासाठी खालील काळजी घ्या.
– डॉक्टरांच्या सल्ल्याने डोळ्यांसाठी आयड्रॉप घेऊ शकता.
– २०-२०-२० या फॉर्म्युल्याचा वापर करा. यामध्ये प्रत्येकी २० मिनिटांनी कॉम्प्युटरच्या स्क्रिनपासून २० फूटावर असणाऱ्या कोणत्याही वस्तूकडे २० सेकंदासाठी पहा.
– नियमितपणे पापण्यांची उघड झाप करा.
– कामाच्या दरम्यान मधून-मधून ब्रेक घेत राहा.
– कॉम्प्युटरचा ब्राईटनेस नेहमी बदलत रहा. रात्रीच्या वेळी ब्राईटनेस कमी ठेवा आणि दिवसा कॉम्प्युटरचा स्क्रिन स्वतः पासून २०-३० इंचावर ठेवा.
– कॉम्प्युटरची स्क्रिन डोळ्यांच्या समोर किंवा थोडा खाली असली पाहिजे.