आरोग्यनामा ऑनलाइन टीम – घामाचा त्रास उन्हाळ्यात जास्त होतो, परंतु हा त्रास काहींना थंड हवामानातही होतो. घरामध्येच उपलब्ध असलेल्या काही गोष्टींचा वापर करून हा त्रास दूर होऊ शकतो. ही समस्या किरकोळ असली तरी कामाच्या ठिकाणी यामुळे अवघडल्यासारखे वाटते. हा त्रास टाळायचा असेल तर खूप सोपे उपाय असून ते केल्यास लवकर आराम पडतो.
हे उपाय करा
* बटाट्याचा तुकडा कापून काखेत आणि जास्त घाम येत असलेल्या ठिकाणी रगडा. हा घाम कमी करण्याचा सर्वात सोपा उपाय आहे.
* घामामध्ये असलेले अॅसिड सूक्ष्म जीवाणू निर्माण करते, ज्यामुळे दुर्गंध येतो. जास्त घाम येतो त्या ठिकाणी थोडासा बेकिंग सोडा लावा. या उपायाने घाम येणार नाही.
* शरीरात मॅग्नेशियमची कमतरता हे घाम येण्याचे मोठे कारण असू शकते. यासाठी हिरव्या भाज्या, बटाटे, केळी, सफरचंद नियमित खा. जास्त घाम आल्याने शरीरात उपलब्ध असलेले मॅग्नेशियमसुद्धा कमी होऊ लागते. यामुळे याचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खावेत.
* भरपूर पाणी प्यावे. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नये. पाण्याप्रमाणे इतर पेय पदार्थांचे सेवन करावे. फळांचा रस, नारळ पाणी, लिंबू-पाणी आणि हर्बल टी घ्या.
* दररोज एक ते दोन ग्लास टोमॅटोचा रस घ्या. याचे सेवन केल्याने घाम कमी येतो. टोमॅटो अँटीऑक्सीडेंट आहेच त्याचबरोबर हे त्वचेवरील छिद्रांना आकुंचित करते ज्यामुळे घाम कमी येतो.
* एक चमचा मीठ लिंबाच्या रसामध्ये मिसळून हातावर चांगल्याप्रकारे मळून हे मिश्रण घामाच्या ग्रंथीची गती मंद करते.
* दरोज द्राक्ष खाल्ल्याने जास्त घाम येण्याची समस्या दूर होऊ शकते.
* १० ग्रॅम कापूर नारळाच्या तेलामध्ये टाकून हे तेल जास्त घाम असलेल्या ठिकाणी लावावे.