आरोग्यनामा ऑनलाइन टीम – खाण्यापिण्याच्या सवयी आणि व्यसनांमुळे कर्करोग वेगाने वाढत आहे. तसेच हार्मोन्स, वजन वाढ, रेडिएशन हीदेखील कर्करोगाची कारणे आहेत. यापासून नेहमी दूर राहिल्यास हा धोका टाळता येऊ शकतो, असे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटने म्हटले आहे. हानिकारक केमिकल्स, रेडिएशन व अन्य कारणांनी पेशींचे डीएनए नष्ट होऊ लागतात. ही कर्करोगाची सुरुवात असून यामुळे पेशी वेगाने वाढू लागतात. अशा स्थितीत पुढील धोका टाळण्यासाठी तातडीने निदान व उपचार केले पाहिजेत.
का होतो कर्करोग
* अति तीव्र सूर्यप्रकाशात जास्त वेळ घालवणे.
* हिपॅटायटिस बी, एचपीव्ही आणि इतर व्हायरल इन्फेक्शनपासून स्वत:ला इम्युनिटी द्या.
* धूम्रपानामुळे फुप्फुसे, ब्लॅडर आणि किडनीचा कर्करोग होऊ शकतो. यामध्ये तंबाखूपासून बनलेल्या सर्व प्रकारच्या पदार्थांचा समावेश आहे.
कोणती काळजी घ्यावी
* खानपानाच्या सवयीत सुधारणा करा. फळे-भाज्यांचे प्रमाण वाढवावे. जास्त फॅटवाले पदार्थ आणि दारूचे सेवन कमी करा.
* वजन संतुलित ठेवल्याने छाती, अंडाशय व मूत्रपिंडाच्या कर्करोगाची भीती कमी होते. यासाठी आठवड्यात १५० मिनिटांपर्यंत मॉडरेट अॅरोबिक किंवा ७५ मिनिटे अॅरोबिक फिजिकल व्यायाम करा.
* वेळोवेळी स्क्रीनिंग आणि मेडिकल टेस्ट करा. ज्यामुळे कर्करोगाचे निदान लवकर होईल. डॉक्टरांशी बोलून कर्करोगाचे स्क्रीनिंग शेड्यूल तयार करा. यामुळे कर्करोगाचे निदान आणि उपचार लवकर सुरू करता येऊ शकतात.
* सूर्यप्रकाश जेव्हा सर्वात तीव्र असतो, अशा वेळी घराच्या बाहेर निघणे टाळा. यामुळे कर्करोगाची भीती राहणार नाही. बाहेर निघण्याआधी सनस्क्रीन अवश्य लावावे.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)