आरोग्यनामा ऑनलाईन टीम – काही खाताना अचानक दातांमध्ये झिणझिण्या येण्याची समस्या अनेकांना असते. यास सेंसिटीव्हीटी असेही म्हटले जाते. यामुळे काही खाणे अथवा पिणे अवघड होऊन बसते. त्यामुळे संबंधित व्यक्तीला खुप त्रास सहन करावा लागतो. ही समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय असून ते केल्यास या समस्येतून सुटका होऊ शकते. हे उपाय कोणते ते जाणून घेवूयात.
हे उपाय करा
1 भरपूर पाणी प्या
दिवसभरात कमीत कमी चार लिटर पाणी प्या. जेवणानंतर खळखळून चूळ भरा. यामुळे दातांमध्ये अडकलेले पदार्थ निघून जातील.
2 कॅल्शिअमयुक्त पदार्थ खा
दुधाच्या पदार्थांमध्ये भरपूर कॅल्शिअम असते. पालेभाज्या आणि सुकामेव्यातही कॅल्शिअम असते.
3 रूट कॅनल
रुट कॅनलने दातांमध्ये येत असलेल्या झिणझिण्या बंद होतात.
4 स्वच्छता करा
दातांच्या स्वच्छतेसाठी मुलायम ब्रश, माऊथवॉशचा वापर करा. दिवसातून दोनदा ब्रश करा. काही खाल्यानंतर गुळणी करा.
5 आहार
ड्रिंक, टोमॅटो, संत्री, ज्यूस, लिंबाला रस आणि सोडा टाळा. मसालेदार पदार्थ जास्त खाऊ नका. फायबर जास्त असलेले पदार्थ खा.