रोगप्रतिकारकशक्ती झटपट वाढवतील ‘हे’ साधेसोपे उपाय, जाणून घ्या

Immunity-power

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पावसाळ्यात अनेक साथीचे रोग वेगाने पसरतात. कारण या काळात आजारांचे विषाणू जलदगतीने वाढतात आणि सक्रिय होतात. त्यामुळे पावसाळ्यात या आजारांचा सामना करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे गरजेचे असते. जर रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत असेल तर आरोग्यासाठी ते घातक ठरते. कमकुवत प्रतिकारक्षमतेमुळे व्यक्ती वारंवार आजारी पडते. रोगप्रतिकारकशक्ती त्वरित वाढवणारे काही खास उपाय असून त्याबाबतची माहिती आपण घेणार आहोत.

हे उपाय करा

* कोरफडीच्या पानातील एक चमचा गर काढून पाण्यासोबत घ्यावा. यामुळे त्वचा आणि संधिवाताचे आजार दूर होतात. रोगांशी लढणारी रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

* नियमित प्राणायाम करा. मॉर्निंग वॉक करावा. प्राणायाम केल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

* व्हिटॅमिन सी असलेल्या फळांचे सेवन करावे किंवा आवळ्याचे ज्यूस घेऊ शकता. यामध्ये रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याची क्षमता आहे.

* जेवण करण्यापूर्वी साबण आणि गरम पाण्याने हात स्वच्छ धुवून घ्यावेत.

* रात्री झोपण्यापूर्वी हळद टाकलेले कोमट दुध प्यावे. हा उपाय केल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढेल.

* रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी टॅबलेट आकाराचा कापूर पाण्यासोबत घ्यावा. लक्षात ठेवा कापूर महिन्यातील एक ते दोन वेळेसच घ्यावा. लहान मुलांना केळी किंवा बटाट्यामध्ये मिसळून द्यावा. यामुळे त्यांना त्रास होणार नाही.

* सकाळी कोमट पाण्यासोबत लसणाच्या दोन पाकळ्या खाव्यात.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)