आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मानसिक परिश्रम, थकवा, पचनक्रियेतील समस्या, शारीरिक आणि मानसिक दुर्बलता यामुळे मेंदुवर वाईट प्रभाव पडतो. यामुळे स्मरणशक्ती कमजोर होते. शरीरातील सर्वच हालचाल ह्या मेंदुच्या सांगण्यावरुन होत असतात. मेंदुशिवाय शरीराचा कोणताच भाग काम करु शकत नाही. यावरून मेंदूचे महत्व अधोरेखित होते. यासाठी मेंदूची कार्यक्षमता आणि आरोग्य वाढवणे खूप गरजेचे असते. मेंदुची कार्यक्षमता वाढवण्याच्या नैसर्गिक उपायांची महिती आपण घेणार आहोत.
काळे मिरे
काळे मिरे औषधी गुणांनी युक्त असते. यामुळे मेंदूची कमजोरी दूर होऊन स्मरणशक्ती वाढते.
बडीशेप
बडीशेप आणि खडीसाखर समान प्रमाणात मिसळून हे चुर्ण जेवणानंतर नियमित खावे. मेंदूची क्षमता वाढते.
दालचिनी
दालचिनीमुळे मेंदूची कमजोरी दूर होते. रात्री झोपताना नियमित चिमुटभर दालचिनी पावडर मधासोबत घेतल्याने मानसिक तणाव दूर होतो.
जवसाचे तेल
जवस हे मेंदूची एकाग्रता आणि शक्ती वाढवते. याचे नियमित सेवन केल्याने मेंदूचा कोणताच आजार होत नाही.
अक्रोड
अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स, मॅगनीज, तांबा, पोटॅशियम, कॅल्शियम, आयरन, मॅग्नेशियम, झिंक आणि सेलेनियमसारखे मिनरल्स असतात. अक्रोड व्हिटॅमिन ईचा चांगला स्त्रोत आहे. हे आपल्या मेंदूसाठी खुप फायदेशीर असते.
जायफळ
जायफळ हे बुध्दी तल्लख करण्यात मदत करते. यामुळे विसरण्याचा आजार होत नाही.
बदाम
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी रात्री पाच बदाम पाण्यात भिजवा. या बदामांची पेस्ट बनवून एक ग्लास दूधामध्ये टाका, यामध्ये एक चमचा मध मिसळून प्या.
ब्राम्ही
याच्या नियमित सेवन केल्याने मेंदूची शक्ती वाढते. एक चमचा रोज प्यायल्याने फायदा होतो.