दातांचा पांढरा, जिभेचा गुलाबी रंग सांगतो कसे आहे तुमचे आरोग्य
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – तोंडाची स्वच्छता आणि आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. तोंडाची योग्य काळजी घेतली न गेल्यानेसुद्धा विविध आजार होतात. केवळ दात खराब होणे, मुखदुर्गंधी हेच नव्हे तर इतरही आजार यामुळे होतात. यासाठी दात आणि जिभेची स्वच्छता खूप महत्वाची आहे. दिवसातून दोनवेळा ब्रश करणे आणि नियमितपणे जीभ स्वच्छ करणे गरजेचे आहे. शिवाय, वर्षातून एक-दोन वेळा डॉक्टरांकडून दात तपासून घेतले पाहिजेत. यामुळे कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही. दातांचा पांढरा आणि जिभेचा गुलाबी रंग आरोग्याचा परिचय करून देतो. यातील कोणताही बदल शरीराची कमतरता दर्शवतो.
हे लक्षात ठेवा
* सामान्यापेक्षा अधिक पांढरे दात निरोगी असतात, हा भ्रम ठेवू नये. शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे असे होते.
* दाढेचा वरचा भाग चपटा, कापलेला किंवा घासलेला असेल तर हा तणावग्रस्त असल्याचा संकेत आहे. राग येणे, चिडचिड होणे किंवा तणाव असल्यावरच व्यक्ती दातांना कराकरा चावत असते.
* गर्भावस्थेत हिरड्या लाल होणे, फुगणे किंवा त्यात सूज येणे सामान्य बाब आहे.
* जेव्हा हिरड्या दात सोडायला लागतात तेव्हा दातांचे मूळ उघडे पडू लागते. हे पिरियोडोंटल डिसीजचे लक्षण आहे. तसेच हे मधुमेह, कार्डियोवेस्क्युलर आणि श्वासासंबंधी समस्या उद्भवण्याचे पूर्व संकेत असू शकतात.
* हिरड्यांतून लागोपाठ रक्तस्राव होत असल्यास हा ल्युकेमियाचा संकेत असू शकतो. याकडे दुर्लक्ष करू नका.
* गालांच्या आतील त्वचेवर भुरक्या रंगाचे डाग दिसून आले तर हा एडिसन आजार असू शकतो. हा एक प्रकारचा हार्मोनल डिसऑर्डर आहे.
* एखादा फोड किंवा जखम झाल्यावर त्याकडेही कानाडोळा करू नये. कारण हा कॅन्सरही असू शकतो.
* जर जिभेवर गदड लाल रंगाचे डाग असले तर हे शरीरात व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता असल्याचा संकेत आहे.
* जिभेचा वरील भाग लाल तसेच त्यावर डॉट्स दिसत असतील तर हा रक्त वाहिन्यांमध्ये सूज येण्याचा संकेत आहे.
* जिभेला फोड येणे हे सारकॉइडॉसीसचे सुरुवातीचे लक्षण आहे. तसेच अंगाला सूज येण्याचाही हा संकेत असू शकतो.
* तोंड कोरडे पडणे हा साइड-इफेक्ट आहे. हा दुष्परिणाम एखाद्या औषधाच्या सेवनामुळेही होऊ शकतो. तसेच हे मधुमेह आणि ऑटो इम्युन डिसीजसह अर्थरायटिस व लिंफोमाचेही लक्षण असू शकतात.
* हिरड्यांमध्ये संसर्ग झाल्यास हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता दुप्पट असते. तोंडातील हानिकारक बॅक्टेरिया सहजपणे हृदय वाहिन्यांमध्ये असलेल्या फॅटी प्लाकला चिकटतात आणि रक्तप्रवाह बाधित करण्यासाठी जबाबदार ठरतात.
* हिरड्यांशी संबंधित संसर्ग असतो त्यांना अल्झायमर होण्याची शक्यता अधिक असते.
* गरोदर महिलांना दात किंवा हिरड्यांशी संबंधित समस्या असतात त्यांना बाळंतपणापर्यंत अधिक त्रासाचा सामना करावा लागतो.
* श्वासासंबंधी असलेल्या सीओपीडी आणि न्युमोनिया यासारख्या आजारांचा धोका हिरड्यांच्या संसर्गामुळे वाढतो.
Comments are closed.