उपाय –
झेंडूच्या फुलाचा रस-
झेंडूच्या फुलाचा रस काढा. हा रस नारळाच्या तेलात टाकून उकळून घ्या. हे तेल थंड झाल्यानंतर बाटलीत भरून ठेवा. हे तेल रोज केसाला लावल्यानंतर केस गळणार नाहीत.
कांद्याचा रस
कांद्याचा रस लावा. अर्धा तासानंतर धुऊन टाका.
आवळा चूर्ण –
दोन लीटर पाण्यामध्ये आवळ्याचे चुर्ण, लिंबाची पाने टाका. दोन लीटर पाणी आर्धे होईपर्यंत उकळत ठेवा. या पाण्याने आठवड्यातून दोन वेळा केस स्वच्छ करा. यामुळे केस गळती थांबते.
आवळा , शिकेकाई , मेहंदी –
आवळा आणि शिकाकायी लोखंडाच्या कढईत भिजत घाला. दोन दिवसांनी ते काढूण वाटून घ्या. त्यातील बिया काढून टाका. त्यात दही आणि मेंहंदी घाला. ते डोक्याला लावा आणि नंतर चार तासांनी धुवून काढा.
ऑलिव्ह ऑइल-
ऑलिव्ह ऑइलमध्ये एक चमचा मध आणि एक चमचा दालचीनी पावडर टाकून पेस्ट तयार करावी. केस धुण्यापूर्वी ही पेस्ट डोक्याला लावावी. पंधरा मिनिटा नंतर केस कोमट पाण्याने स्वच्छ धुवावेत.
मेथीच्या बीया
मेथीच्या बीया रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.सकाळी याचे पेस्ट तयार करा. हे पेस्ट केसाला लावल्यांनतर केस गळती थांबते.