अशाप्रकारे परत मिळू शकते त्वचेची चमक, ‘हे’ ४ उपाय आवश्य करा
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – त्वचेची चमक कमी झाल्याचे अनेकदा जाणवते. पूर्वीची चमक आणि आताची चमक यातील फरक लगेचच लक्षात येतो. त्वचेचा हा तजेलदारपणा का निघून जातो, याची विविध कारणे आहेत. पूर्वीप्रमाणे त्वचेची चमक मिळवायची असेल तर काही उपाय आहेत, जे केल्यास गेलेली चमक परत मिळू शकते. शिवाय काही काळजी देखील घेणे गरजेचे असते.
हे आवश्य करा
अँटी-ऑक्सिडंट
जीवनसत्त्व असलेल्या पदार्थांचा आहारात दररोज समावेश करा. आवळा, संत्री, लिंबू यांचे सेवन नेहमी सेवन करा.
सनस्क्रीन
रोज एसपीएफ-३० युक्त सनस्क्रीनचा वापर करा. त्यामुळे त्वचेवरील डाग कमी होतील. असमान रंगछटा जातील.
फेसवॉश
स्किन ब्रायटनिंग फेसवॉशचा वापर करा. विशेषत: असमान त्वचाछटांवर हे काम करते. महिन्यातून एकदा फेशियल करा.
एक्सफोलिएट
यासाठी स्क्रबचा वापर करा. शिवाय फेसाळणारा फेसवॉश वापरा. यात एक्सफोलिएट बीड् असावेत. घरात साखर आणि मधानेही स्क्रब तयार करू शकता. एक्सफोलिएशनमुळे मृत त्वचापेशी गळून जातात. त्यामुळे त्वचा रंध्रे खुली होतात.
मॉइश्चरायझिंग
सुरकुत्या आणि व्रण कमी करण्यासाठी त्वचेला चांगले मॉइश्चरायझिंग करा
Comments are closed.