उष्णतेमुळे होते पायाच्या तळव्यांची आग, ‘हे’ उपाय केल्यास मिळेल आराम

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – कधी-कधी उष्णतेमुळे पायांच्या तळव्यांची आग होते. ही जळजळ खूप वाढू शकते. यास पॅरेसथीसिया असे म्हटले जाते. हा आजार दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. हे उपाय केले असता चांगला फरक दिसून येतो.

हे उपाय करा

* २ ग्लास गरम पाण्यामध्ये १ चमचा मोहरीचे तेल टाकून दोन्ही पाय या पाण्यामध्ये ठेवा. ५ मिनिटांनी पाय घासून थंड पाण्याने धुवून घ्या.

* मेंदीमध्ये लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट पायांना लावल्यास आराम मिळेल.

* भोपळा बारीक खिसुन हा गर पायांच्या तळव्यांना लावा. या उपायाने पायांची जळजळ कमी होईल.

* रात्री झोपताना थोडीशी साय घेऊन त्यामध्ये लिंबाचा रस मिसळून तळव्यांची मालिश करा. सकाळी थंड पाण्याने पाय धुवून घ्या. या उपायाने तळव्यांची जळजळ नष्ट होते.

* अद्रक बारीक कुटून रस काढून घ्या. यामध्ये थोडेसे ऑलिव्ह तेल किंवा नारळाचे तेल मिसळून हे मिश्रण कोमट करून घ्या. रात्री झोपण्यापूर्वी या मिश्रणाने तळव्यांची १० मिनिटे मालिश करा.

* रात्री झोपण्यापूर्वी लोणी पायांना लावून झोपल्यास तळव्यांची जळजळ कमी होते.